बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन यांच्यातर्फे बेळगाव जिल्ह्यातील इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी रोटरी बेस्ट स्टुडंट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही माध्यमाच्या 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यासर्व विद्यार्थ्यांमधून मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी प्रसाद बसवंत मोळेराखी याचा प्रथम क्रमांक आला आहे. …
Read More »फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून गरीब कुटुंबाचा छळ; तारिहाळ गावातील घटना
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील तारिहाळ गावात फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसह वृद्ध आई – वडिलांना घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. पाच लाखांचे कर्ज घेतलेल्या गणपत लोहार यांच्या घरी आलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक घरावर जप्तीची कारवाई केली. यावेळी कुटुंबाला कोणत्याही वस्तूला हात लावण्याची परवानगी न देता, संसारोपयोगी सामान …
Read More »स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघातर्फे पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय ग्रंथालयाला पुस्तकांची भेट
बेळगाव : स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सुभाषचंद्र बोस जयंती सैनिक भवनमध्ये साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाला संघातर्फे ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र कलघटगी हे होते. सुभाष चंद्र बोस जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जयंतीच्या शुभेच्छा …
Read More »ज्ञानमंदिर शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ
बेळगांव : महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी मैदानावर दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजू भातकांडे, बाळु धोंगडी, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, फरिदा मिर्झा, क्रिडा शिक्षक बाबु देसाई उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या …
Read More »आणखी एका बाळंतिणीचा उपचारादरम्यान मृत्यू; अथणी रुग्णालयातील घटना
अथणी : बेळगाव जिल्ह्यात बाळंतिणींच्या मृत्यूची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना अथणी येथील रुग्णालयात घडली आहे. येथील मुतव्वा संतोष गोळसंगी (21) या बाळंतिण महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुतव्वा हिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मुतव्वाला ३१ जानेवारी ही प्रसूतीची तारीख …
Read More »अनगोळ येथे ब्युटी पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय : पोलिसांचा छापा; महिलेला अटक
बेळगाव : बेळगावातील अनगोळ परिसरात आज सकाळी एका ब्युटी पार्लर आणि स्पावर पोलिसांनी छापा टाकला. अनगोळ परिसरात असलेल्या अंजली स्पा आणि ब्युटी पार्लरवर पोलिसांनी आज सकाळी छापा टाकला असता तेथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी स्पामध्ये असलेल्या 6 महिलांची सुटका केली. स्पा आणि ब्युटी पार्लरच्या मालक अंजली संजय …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव : नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात मोठ्या उत्साहात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोंचे पूजन कन्नड विषयाचे शिक्षक श्री. एस. एस. केंगेरी यांनी केले. तदनंतर अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. समाज विज्ञान विषयतज्ञ शिक्षक श्री. एम. पी. कंग्राळकर सर यांनी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या पूनम नावगेकर यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरी ‘अ’तील विद्यार्थी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भित्तीपत्रके प्रदर्शन मांडले. तर अथर्व रमेश सांबरेकर याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशात …
Read More »युवा समितीच्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी
बेळगाव : आज २३ जानेवारी रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तर उपाध्यक्ष वासु सामजी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात …
Read More »येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात
येळ्ळूर : येळ्ळूर येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचा 25 वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील होते. सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील व उपाध्यक्ष रघुनाथ मुरकुटे यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta