बेळगाव : पत्नीला मोबाईलवर मॅसेज पाठवल्याबद्दल विचारणा केल्याने 20 ते 25 तरुणांच्या टोळक्याने ऑटोचालकावर लाठ्याकाठ्या व प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना संगोळी रायण्णा सर्कल येथे घडली. या हल्ल्यात ऑटोचालक वसीम बेपारी हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील वीरभद्रेश्वर नगर येथील एका …
Read More »शुभम शेळके हद्दपारीवर पुढील सुनावणी 7 मे रोजी
बेळगाव : समाज माध्यमावर प्रतिक्रिया देऊन दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एम. कालिमिर्ची यांनी डी.सी.पी. रोहन जगदीश यांचेकडे शुभम शेळके यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव ठेवला होता. आज 21 एप्रिल रोजी त्याची सुनावणी पोलीस उपायुक्त कार्यालयात न्याय दंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर पार पडली, …
Read More »सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांच्यावतीने मोफत पाणी पुरवठा उपक्रम…
बेळगाव : सध्याचे उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन श्री चांगळेश्वरी व श्री कलमेश्वर यात्रेनिमित्त सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व अभियंता गोविंद टक्केकर यांच्या श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स फर्मतर्फे येळ्ळूर येथे टँकरद्वारे मोफत पिण्याचे पाणी पुरवठा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ आज झाला. येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील श्री चांगळेश्वरी …
Read More »सीईटी परीक्षेदरम्यान जानवे कापून काढल्याच्या निषेधार्थ ब्राह्मण समाजाकडून आज बेळगावात आंदोलन…
बेळगाव : सीईटी परीक्षेदरम्यान जानवे कापून काढण्यात आले. या प्रकारातून ब्राह्मण समाजावर अन्याय झाला आहे. या घटनेचा निषेध करत बेळगावात ब्राह्मण समाजाकडून आज सोमवारी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत कृष्णमठाचे डॉ. श्रीनिवास आचार्य होन्निदिब्ब यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजासाठी अत्यंत पूजनीय असलेल्या जानव्याला तोडण्याचे, अपमानास्पद प्रकार …
Read More »चव्हाट गल्ली परिसरात 11 वर्षीय बालकावर बेवारस कुत्र्यांचा चावा
बेळगाव : बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच आहे. चव्हाट गल्ली परिसरात 4 ते 5 कुत्र्यांनी शिवराज जयानंद शंकपुरे वय वर्ष 11 राहणार चव्हाट गल्ली याच्यावर हल्ला करून चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेकडे तसेच संबंधित प्रभागाच्या नगरसेवकाकडे वारंवार मागणी करून देखील …
Read More »बेळगाव विभागीय कृषी सवलती वितरण समारंभ
बेळगाव : वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे म्हादई प्रकल्पास विलंब होत आहे. म्हादई , मेकेदाटू, कृष्णा उच्च भाग प्रकल्पांतर्गत आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यासह राज्यातील अर्धवट असलेले सर्व सिंचन प्रकल्प तात्काळ सुरू करण्यास राज्य सरकार तयार आहे. केंद्र शासनाने संघराज्य प्रणालीमध्ये मध्यस्थी करत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस अनुकूलता निर्माण करावी, अशी …
Read More »कलामंदिर आणि व्यापारी संकुलामधून मिळणारे उत्पन्न बेळगाव शहराच्या विकासासाठी वापरा; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आवाहन
टिळकवाडी येथील कलामंदिराचा उद्घाटन सोहळा बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रविवारी (20 एप्रिल) केंद्र आणि राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 47.83 रुपये खर्चून टिळकवाडी येथे 2.62 एकर जागेवर बांधलेल्या आधुनिक सुविधांनी युक्त बहुमजली (कलामंदिर) इमारतीचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बहुउद्देशीय कलादालन आणि …
Read More »पक्ष्यांसाठी धान्य, पाणी ठेवा उपक्रम : जायंट्स मेनतर्फे मातीची भांडी वाटप
बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशुपक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे तहानेने व्याकुळ होत आहेत त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर परसबागेत बाल्कनीमध्ये पाणी आणि धान्य ठेवावे असे आवाहन जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले. बॉक्साइट रोड वरील ग्रीन गार्डनमध्ये जनजागृती कार्यक्रम …
Read More »सार्वजनिक वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून संस्थेस ग्रंथ खरेदी या उपक्रमासाठी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई या संस्थेतर्फे “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास अर्थसाहाय्य” या योजनेंतर्गत मिळालेल्या अनुदानातून विविध विषयांवरील दर्जेदार सुमारे ५०० ग्रंथ खरेदी करण्यात आलेले असून या …
Read More »दहावीच्या विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिकेत चक्क प्रेमाच्या ओळी अन लाच!
बेळगाव : राज्यात दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी काम सुरू असताना, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही मूल्यांकन केंद्रांमध्ये विचित्र, मजेशीर आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. काही विद्यार्थ्यांनी उत्तर न लिहिता भावनिक अपील, प्रेमाची कबुली, लाच आणि विनंतीने उत्तरपत्रिका भरून टाकल्या आहेत. “सर, मला पास करा, मी तुमच्यावर प्रेम करेन”, किंवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta