Wednesday , December 17 2025
Breaking News

बेळगाव

ऑगस्ट महिन्यात इस्कॉनमध्ये भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने येत्या ऑगस्ट महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक एक ऑगस्ट रोजी मॉरिशसच्या इस्कॉनचे श्री सुंदर चैतन्य गोसावी महाराज यांचे आगमन होत असून एक, दोन व तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेपर्यंत त्यांची प्रवचने होणार आहेत. दिनांक …

Read More »

पूरस्थितीत मदत कार्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून बेळगाव, निपाणी व खानापूरात समाजसेवकांची टीम जाहीर

  बेळगाव : संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी बेळगाव शहर व तालुका, निपाणी शहर व ग्रामीण परिसर व खानापूर तालुक्यासाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून समाजसेवकांची टीम जाहीर करण्यात आली आहे. या पूरस्थितीमुळे कोणाला कोणतीही समस्या उदभवल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संघटनेकडून …

Read More »

गोकाक तालुक्यात स्कूल बस उलटून ६ विद्यार्थी गंभीर

  गोकाक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थी गंभीर जखमी तर अनेक जण किरकोळ जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यातील पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉसजवळ बुधवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मरडीमठ या खासगी शाळेची बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले …

Read More »

बसवन कुडची-बागलकोट मार्गावर पूर; दवाखान्यात पाणी शिरले

  बेळगाव : मुसळधार पावसाने बेळगावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील बसवनकुडची गावात मुसळधार पावसाने मोठी आपत्ती निर्माण केली आहे. मुसळधार पावसामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून बागलकोट रस्ता पाण्याखाली गेला आहे. येथील दवाखाना आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसून नुकसान …

Read More »

पूर आल्यास ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा; जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची सक्त सूचना

  बेळगाव : गेले सहा दिवस बेळगाव जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे नदी, नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून बेळगाव जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 427 काळजी केंद्रांना भेट देऊन तयारीच्या सुचना देण्यात केल्या. आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे याबाबतही प्रत्येक तालुक्यातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात …

Read More »

जादूटोण्याच्या संशयाने पोटच्या मुलींची हत्या करणाऱ्या नराधमास जन्मठेप

  बेळगाव: जुलै 2021 मध्ये, आरोपी अनिल चंद्रकांत बांदेकर, बेळगाव याने एपीएमसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर 2रा क्रॉस, कंग्राळी (खुर्द) गावातील आपल्या घरासमोर कोणीतरी जादूटोणा केल्याने नाराज झालेल्या नराधम पित्याने आपल्या अंजली (8) आणि अनन्या (4) यांची विष पाजून हत्या केली होती. नराधम पतीच्या विरुद्ध पत्नी जया बांदेकर यांनी …

Read More »

पावसाचा जोर लक्षात घेऊन उद्या एक दिवसाची सुट्टी जाहीर!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असून बेळगाव जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जाणे अवघड होणार असल्याची दखल घेऊन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना उद्या बुधवार दिनांक 24 जुलै रोजी आणखी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव आणि खानापूर तालुक्यांमध्ये अंगणवाडी ते बारावी पर्यंतच्या सर्व …

Read More »

सागर बी.एड्. महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफल उत्साहात

  बेळगाव : सागर शिक्षण (बी.एड्.) महाविद्यालयात गुरूपौर्णिमेनिमित्त स्वरांजली सुगम संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थींनी विविध सुमधूर प्रार्थना गीते, भजने, भावगीते, भक्तीगीते, लोकगीते, सिनेगीते, देशभक्तीगीते उत्कृष्टपणे प्रस्तुत करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाची सुरूवात प्रशिक्षणार्थींच्या सुमधूर प्रार्थनेने झाली. प्रा. एस. पी. नंदगाव यांनी …

Read More »

जमिनीच्या वादातून एकमेकांवर हल्ला; दोघांचाही मृत्यू

  बेळगाव : जमिनीच्या वादातून दोघांनी एकमेकांवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अथणी तालुक्यात घडली. हणमंत रामचंद्र खोत (३४) आणि खंडोबा तानाजी खोत (३२) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही अथणी तालुक्यातील खोतवाडी गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीवरून वाद सुरू होता, गावातील …

Read More »

पाय घसरून नदीत पडल्याने तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाजवळ पाय घसरून नदीत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहन पाटील (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. नैवेद्य सोडण्यासाठी मित्रासोबत नदीवर गेला असता पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचच्या …

Read More »