बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी संतोषची पत्नी उमा हिला अटक केले. उमा हिच्यासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची गुरुवारी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. संतोष पद्मन्नावर यांची पत्नी उमा हिला माळ मारुती पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतले व न्यायालयात हजर केले. आरोपी पत्नी उमा, …
Read More »बेल्ट परीक्षेत पाच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान
बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्यावतीने डॉ. जे. टी. सिमंड्स हॉलमध्ये घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत पाच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. विविध बेल्टसाठी झालेल्या या परीक्षेत एकूण 85 कराटेपटू सहभागी झाले होते. श्लोक गड्डी, यशस्विनी किल्लेकर, श्रद्धा अंगडी, मृणांक किल्लेदार व श्रेयस अंगडी ब्लॅक …
Read More »आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी दिली मध्यवर्ती बसस्थानकाला भेट
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या सद्यस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि स्थानिक प्रवासी आणि ऑटो चालकांना प्रभावित करणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांबद्दल माहिती घेण्यासंदर्भात भेट दिली व तेथील विकास कामाची पाहणी केली. बस स्थानकाची एकूण कार्यक्षमता वाढवणे हा आहे. त्यांच्या भेटीदरम्यान, सेठ यांनी ऑटोरिक्षा युनियनच्या प्रतिनिधींशी त्यांची …
Read More »उद्योजक संतोष पद्मन्नावर हत्येप्रकरणी दोन आरोपीना अटक
बेळगाव : उद्योजक संतोष पद्मन्नावर यांच्या हत्येप्रकरणी माळमारुती पोलिसांना रात्री उशिरा दोन आरोपींना अटक केली आहे. बेंगळुरू स्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक केली आणि बेळगावला आणले, तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उमाचा फेसबुक फ्रेंड असलेल्या शोभित गौडाला उमाने ९ तारखेला फोन करून सर्व …
Read More »उद्योजक खून प्रकरण : मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी; पुढील प्रक्रिया पीएम अहवालानंतरच
बेळगाव : उद्योजक संतोष पद्मण्णवर यांचा ९ ऑक्टोबर रोजी नैसर्गिक मृत्यू ठरलेल्या प्रकरणात त्यांच्या मुलीने खुनाची तक्रार दिल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. खुनाचा गुन्हा दाखल करून घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून बुधवारी तेथेच उत्तरीय तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. मृताच्या पत्नीसह पाच जणांविरोधात माळमारुती पोलिसांत …
Read More »नवीन जलाशयाच्या बांधकामाला बसुर्ते ग्रामस्थांचा विरोध; बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात नवीन जलाशयाच्या बांधकामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 9 गावांना सतत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारने 250 एकर जागेवर नवीन जलाशय बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध बेळगाव तालुक्यातील बसुर्ते ग्रामस्थांनी केला. कोणत्याही कारणास्तव आपली जमीन देणार नसल्याचा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसुर्ते गावातील शेतकरी …
Read More »निवडणूक जाहीरनाम्यात सीमाप्रश्नाचा उल्लेख करावा : मध्यवर्ती म. ए. समितीची मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात सीमाप्रश्नासंबंधी आपापल्या पक्षाची भूमिका जाहीर करावी अशा प्रकारची पत्रे पाठविण्यात आली आहेत. या संदर्भात आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने इस्लामपूर येथे माजी कृषिमंत्री …
Read More »सीमालढा आणि मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी पत्रकारांचे योगदान मोलाचे : मालोजी अष्टेकर
युवा समितीच्यावतीने मराठी पत्रकारांचा सन्मान बेळगाव : गेली ६७ वर्ष सुरू असलेल्या सीमालढ्यात तसेच माय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी बेळगाव सीमा भागातील मराठी पत्रकारांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, …
Read More »आयआयएचएम संस्थेतर्फे शिक्षकांचा गौरव
बेळगाव : गोवा येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने बेळगावातील शैक्षणिक समूह संस्था प्रमुखांचा तसेच शिक्षकांचा गौरव समारंभ मंगळवारी पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख तसेच सहाय्यक शिक्षक यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. …
Read More »वडिलांचा संशयास्पद मृत्यू; मुलीने केली पोलिसात तक्रार
बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पद्मन्नावर यांच्या मृत्यू प्रकरणी पत्नी उमा यांच्यावर संशय असल्याचा गंभीर आरोप संतोष यांच्या मुलीने केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष पद्मन्नावर हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत महांतेशनगर, अंजनेयनगर परिसरात राहात होते. त्यांना पत्नी व तीन मुले असून मोठी मुलगी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta