बेळगाव : मच्छे व उपनगरात पावसाळ्यात डासांची झपाट्याने वाढ झाल्याने सगळीकडे डेंग्यु आणि चिकणगुणिया झालेले अनेक रुग्ण पहावयास मिळत आहेत त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पिराजी मेडिकल, हुंचेनहट्टी व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या संयुक्त विद्यमाने मच्छे येथील कलमेश्वर मंदिर व हावळ नगर येथील दत्त मंदिर येथे …
Read More »सीमावासीय शिक्षक मंचच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी; नुतन कार्यकारिणी जाहीर
बेळगाव : सीमावासीय प्राथमिक शिक्षक मंच, बेळगावच्या अध्यक्षपदी दशरथ सुर्यवंशी व उपाध्यक्षपदी भैरु अकनोजी यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेची नुकताच सर्वसाधारण बैठक झाली व नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. कर्नाटकाच्या सीमाभागातील महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या ८६५ मराठी बहूसंख्यांक गावातील अनेक शिक्षक महाराष्ट्रातील विविध गावात शिक्षणदानाचे कार्य करीत आहेत. …
Read More »बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा बसविण्याचे निर्देश द्यावेत
माजी आमदार अनिल बेनके यांनी घेतली रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट बंगळुरू : बेळगाव रेल्वे स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा बसविण्यासाठी भाजप राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांची भेट घेतली. या संदर्भात बोलताना अनिल बेनके म्हणाले की, …
Read More »चिक्कोडीत भाजपचा पराभव नाही; अहंकारी अण्णासाहेब जोल्ले हरले : प्रमोद मुतालिक
बेळगाव : चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा पराभव झाला नाही. अण्णासाहेब जोल्ले अहंकारी होते आणि कार्यकर्त्यांना सहकार्य न केल्याने त्यांचा पराभव झाल्याचे श्री राम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी सांगितले. ते आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत भाजप किंवा मोदी किंवा हिंदूंचा …
Read More »आषाढी एकादशी निमित्त हुबळी ते पंढरपुर विशेष रेल्वे सेवा सुरू करा : म. ए. युवा समितीची मागणी
बेळगाव : आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी देशाच्या विविध भागातून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. बेळगावमधून सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरला जातात, या निमित्ताने दरवर्षी रेल्वे विभागाकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येते. आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली असून तरी देखील दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून हुबळी ते पंढरपूर विशेष रेल्वेबाबत …
Read More »वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
बेळगाव : वडगाव येथे होणाऱ्या मंगाई देवी यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला आहे. पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यात्रा काळात मंदिर आवारात किंवा वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशुंचा बळी …
Read More »आरोग्य भारती बेळगाव शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन
बेळगाव : आज आरोग्य भारती बेळगाव शाखेतर्फे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन अनगोळ येथील संत मीरा माधव सभागृहात आयोजित करण्यात आले होते. सकाळी ठिक ६ वाजता ओमकार, दिपप्रज्वलन, पुष्परचना आणि धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे आणि वक्त्या या नात्याने बेळगाव येथील सुप्रसिध्द डॉक्टर, सामाजिक आणि राजकीय …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
बेळगाव : मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता दररोज योग करण्याकडे अधिक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते यामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊ लागतील. त्याचबरोबर आरोग्य ही उत्तम राहिलं आणि गुणवत्ता वाढीस …
Read More »साठे मराठी प्रबोधिनीतर्फे सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे बेळगाव सीमाभागातील प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळेतील मुलांच्या मराठी भाषा समृद्धीसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जाते ज्यामध्ये मराठी …
Read More »मच्छे गावातील महिलांतर्फे अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
बेळगाव : जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. मात्र मच्छे गावातील काही महिलां दरवर्षी वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत असतात. यावर्षी सुद्धा त्यांनी शुक्रवारी दिवसभर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केली, तसेच पूजेसाठी येणाऱ्या महिलांना, वृक्षारोपण व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta