Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

हलगा येथे एकाचा निर्घृण खून

बेळगाव : हलगा (ता. बेळगाव) गावातील बस्तीजवळ हालगा -तारीहाळ रस्त्यावर सौंदत्ती तालुक्यातील एका इसमाचा अज्ञातांनी भररस्त्यात मानेवर वार करून खून केल्याची घटना सायंकाळी 4 च्या दरम्यान घडली. गदगय्या हिरेमठ (वय 40) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर प्रकारामुळे हालगा -तारीहाळ रस्त्यावरील संबंधित परिसरात एकच खळबळ उडवून घबराट निर्माण …

Read More »

मराठीतून कागदपत्रे देण्यासंदर्भासाठी माजी नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार 15 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असल्यास त्यांना त्यांच्या भाषेत सरकारी कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार बेळगांव शहरात 22 टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक राहतात. त्यांना सरकारी परिपत्रके मराठीतून द्यावीत त्याचप्रमाणे महानगरपालिकेवर मराठी बोर्ड लावण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी माजी महापौर …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

  मार्केटचे एसीपी म्हणून एन. व्ही बरमनी तर सायबर पोलीस स्थानक पोलीस निरीक्षकपदी बी. आर. गड्डेकर बेळगाव : बेळगावातील बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे. बेळगाव मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांची बदली गुन्हे विभागाचे एसीपी म्हणून तर गुन्हे विभागाचे एसीपी एन. व्ही. भरमणी यांची मार्केटच्या एसीपी म्हणून नियुक्ती …

Read More »

बेळगावात राष्ट्रीय विधी विद्यापीठाची स्थापना करा : बार असोसिएशनची मागणी

  बेळगाव : राज्याची दुसरी राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी बेळगाव बार असोसिएशनने केली आहे. गुरुवारी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांच्या नेतृत्वाखाली बार असोसिएशनच्या सदस्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन केले. बेळगावमध्ये राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी कर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना …

Read More »

गणेशोत्सव मंडळाना भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून सावरकरांच्या प्रतिमेचे वाटप

  बेळगाव : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिना दरम्यान राबविण्यात आलेल्या ” हर घर तिरंगा” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता गणेश चतुर्थी निमित्त प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा लावण्याचे अभियान हाती घेतले जाणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस आणि विमल फाउंडेशन …

Read More »

खिळेगाव पाणी योजनेच्या ऐनापुर जॅकवेलची आमदारांकडून पाहणी

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची अधिकार्‍यांना सूचना अथणी : अथणी व कागवाड मतदार संघातील दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळावे हेच आपले स्वप्न आहे. डिसेंबरमध्ये खिळेगाव-बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणारच, असा विश्वास माजी मंत्री व आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला. खिळेगाव बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेच्या ऐनापूर येथील मुख्य जॅकवेलला …

Read More »

कावळेवाडीची किरण बुरूड हिचे अभिनंदनीय यश

बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील कुमारी-किरण य. बुरूड हिने नुकताच कडोली येथे शालेय महिला कुस्ती स्पर्धेत 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. ती कर्ले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वीत शिकत आहे. जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे. तिला भविष्यात चांगले प्रशिक्षण मिळाल्यास एक …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेची उद्या सांगता

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने सोमवार दि. 22 पासून संगीत भजन स्पर्धा सुरु असून या संगीत भजन स्पर्धेची सांगता शुक्रवार दि. 26 ऑगष्ट 2022 रोजी होणार आहे. या सांगता समारंभास नेकिनहसूरचे गुरुवर्य ह.भ.प. श्री. भाऊसोा पाटील महाराज अध्यक्ष वारकरी महासंघ महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते …

Read More »

कावळेवाडीचा पै.रवळनाथ कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक

  बेळगाव : कावळेवाडी (बेळगाव) येथील उदयोन्मुख कुस्तीपटू कु. रवळनाथ कणबरकर याने नुकताच शालेय कुस्ती स्पर्धेत कडोली येथे आयोजित केलेल्या तालुका पातळीवर प्रथम येण्याचा मान मिळवला. 17 वयोगटाखालील 65 वजन गटात त्याने हे घवघवीत यश संपादन केले. बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी या शाळेत आठवीत तो शिकत आहे. सध्या सावगाव मठपती कुस्ती …

Read More »

आमदार अनिल बेनके व प्रशासनाने केली विसर्जन मिरवणुक मार्गाची पाहणी

  बेळगाव : आज बेळगावचे उत्तरचे आमदार अनिल बेनके तसेच श्री लोकमान्य गणेश उत्सव महामंडळ यांच्यावतीने श्री गणेश उत्सवाचा समस्यांबद्दल सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून आज बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच श्री गणेश उत्सव मिरवणूकीच्या मार्गावरील समस्यांबद्दल पाहणी करण्यात आली. यावेळी उत्तरचे आमदार अनिल बेनके, बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील, …

Read More »