Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

कन्नड सक्तीकरणाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन!

  बेळगाव : सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांनी मंगळवार दिनांक ९ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सीमाभागात कानडी संघटनाच्या वतीने मराठी भाषिकांच्या फलकावर वाढत्या कन्नड सक्तीकरणाविरोधात बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केले आहे. तरी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी, पदाधिकाऱ्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या …

Read More »

स्वामी समर्थांच्या पालखीचे बेळगावात 12 जानेवारी रोजी आगमन

  बेळगाव : अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी पालखीचा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे हे 27 वे वर्ष असून या सोहळ्याला 25 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूर येथून प्रारंभ झाला असून ही पालखी आता महाराष्ट्राच्या विविध भागात परिक्रमा करीत आहे. ही पालखी 12 जानेवारी रोजी कोवाडहुन …

Read More »

आनंदवाडी आखाड्याची मुहूर्तमेढ

  बेळगाव : रविवारी सकाळी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेची तयारी करण्यासाठी आनंदवाडी आखाड्यात माजी विधानपरिषद सदस्य माननीय श्री. महांतेश कवटगीमठ, गुरूवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती घाडी, डॉ. गणपत पाटील, स्वातंत्र्य सैनिक संघाचे अध्यक्ष व स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या उपस्थितीत आखाड्याचे पुजन करून मुहूर्तमेढ करण्यात …

Read More »

उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

  गोकाक : गोकाकजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील लोळसुरजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात लोळसुर पूल ते नाका क्रमांक 1 दरम्यान झाला आहे. भरधाव ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक सोमवारी

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोमवार दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली येथे बोलवण्यात आली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी होणाऱ्या हुतात्मा दिनाबद्दल व इतर विषयाबद्दल चर्चा होणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे, …

Read More »

२ आंतरराज्य चोरट्यांना अटक; ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोड्या करून हैदोस घालणाऱ्या दोन आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 15 लाख रुपये किंमतीचे 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बैलहोंगल, नेसरगी आदी ठिकाणच्या चोऱ्या आणि घरफोडीच्या मालिकेतील आरोपींबाबत एसपी डॉ. …

Read More »

काँग्रेस रोडवर भरधाव मोटरसायकलची कारला धडक

  बेळगाव : बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर झालेल्या भीषण अपघातात बाईकस्वार युवक गंभीर जखमी झाला. बेळगावातील काँग्रेस रोडवर गुडनेस हेल्थ हब फार्मासमोर आज, शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव मोटरसायकल क्रेटा कारला धडकून ही दुर्घटना घडली. धडकेनंतर मोटरसायकल चालक युवक रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडला. तर त्याचे दोन्ही …

Read More »

आदर्श शाळा पुरस्कारासाठी युवा समितीच्या वतीने आवाहन

  बेळगाव : प्रति वर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने “आदर्श शाळा पुरस्कार २०२३-२४” देण्यात येणार आहेत तरी बेळगाव दक्षिण, उत्तर, ग्रामीण, खानापूर आणि यमकनमर्डी या विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श शाळा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुरस्कारासाठी निकष * विविध शैक्षणिक उपक्रम * विद्यार्थ्यांच्या पटसंख्या वाढीसाठी …

Read More »

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्यावतीने सत्कार

  बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड झाल्याबद्दल क्षत्रिय मराठा परिषदेच्या बेळगाव जिल्हा व तालुका शाखेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. सत्कारावर प्रतिक्रिया देताना अनिल बेनके म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. मराठा समाजाच्या मागण्यांची मला जाणीव आहे. त्यादृष्टीने मराठा …

Read More »

येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून गवत गंज्यांना आग

  येळ्ळूर : येळ्ळूर व मच्छे शिवारामध्ये समाजकंटकांकडून शेतकऱ्यांच्या भात गंजींना तसेच गवत गंज्यांना आग लावण्याचे प्रकार गुरुवारी रात्री घडले आहेत. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. येळ्ळूर येथील कोंडी शिवारामध्ये गंगाधर पाटील, उमेश पाटील यांच्या मोठ्या भात गंज्यांना आगी …

Read More »