बेळगाव : आम्ही बेळगावातील गुन्ह्यांची संख्या गांभीर्याने घेतली असून, मागील गुन्ह्यांच्या तुलनेत सध्या गुन्ह्यांची संख्या कमी झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. बेळगाव शहरात आज पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री परमेश्वर म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यात महामार्ग आणि इतर रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, बेळगाव परिसरात जमीन, मालमत्ता वादातून …
Read More »दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात काँग्रेस सरकार अपयशी : अरविंद लिंबावळी
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात राज्यातील काँग्रेस सरकारला साफ अपयश आले आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला दुष्काळी निधी अपुरा असून, आणखी निधी देऊन तातडीने दुष्काळ निवारण कामांना सुरवात करावी अशी मागणी माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांनी केली. माजी मंत्री भाजप नेते अरविंद लिंबावळी यांच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे अनाथांना कपडे व दिवाळीच्या फराळाचे वाटप
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगावतर्फे दरवर्षी गरजू अनाथांना दिवाळीच्या फराळाचे व कपड्यांचे वाटप करण्यात येते. यावर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गरीब, अनाथ, उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या घरीही दिवाळीचा आनंद साजरा व्हावा, विद्यार्थ्यांना समाजातील तळागाळातील लोकांची ओळख व्हावी. त्यांच्या विषयी सहानुभूती निर्माण व्हावी. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समाजभान सतत जागृत राहावे यासाठी …
Read More »एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार
बेळगांव : एंजल फाउंडेशन आयोजित भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत जवळपास त्यांना स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महिला विद्यालय येथील गिताबाई हेरेकर येथील सभागृहात ही भव्य रांगोळी स्पर्धा पार पडली. यावेळी विजेत्यांना ट्रॉफी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेमधील प्रथम क्रमांक साक्षी अनवेकर, द्वितीय क्रमांक प्रियांका …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बुधवारी बैठक
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या बेळगावातील दिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक येत्या बुधवार दि. 22 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता बोलावण्यात आली आहे. बेळगाव येथे येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटकचे अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र …
Read More »खाऊ कट्ट्यातील दुकानांची पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून पाहणी
बेळगाव : बेळगावातील गोवावेस बसवेश्वर सर्कलजवळ खाऊ कट्टा येथील दुकान वितरण आणि नाल्यालगतच्या इमारतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी खाऊ कट्टा येथील प्रत्येक दुकानाची पाहणी करून चौकशी केली. सार्वजनिक बांधकाम विभाग बेंगळुरू दक्षिणचे मुख्य अभियंता दुर्गाप्पा यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय पथकाने आज …
Read More »फेक न्यूज, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याचे गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांचे निर्देश
बेळगाव : सोशल मीडियावर खोट्या बातम्या, प्रक्षोभक वक्तव्य किंवा व्हिडीओ टाकल्याचे आढळून आल्यास तत्काळ कारवाई करून योग्य ती कारवाई करावी, असे कडक निर्देश गृहराज्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 20) शहरातील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली आणि सोशल नेटवर्क मॉनिटरिंग युनिट आणि कंट्रोल रूमची प्रत्यक्ष पाहणी करून …
Read More »बिजगर्णीच्या ‘त्या’ प्रकरणातील पाच जणांना अटकपूर्व जामीन
बेळगाव : बिजगर्णी येथे यावर्षी लक्ष्मी यात्रा भरविण्यात येणार आहे. त्यासाठी बैठक घेण्यात आली होती. बैठकीमध्ये मागील लक्ष्मी यात्रोत्सवाचा हिशेब मागितल्यानंतर वादावादी झाली होती. यल्लाप्पा बेळगावकर यांना मारहाण केली, अशी तक्रार बेळगाव ग्रामीण पोलिसांमध्ये झाली. त्यानंतर सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. यामधील यापूर्वी एकाला जामीन मंजूर झाला. त्यानंतर …
Read More »येळ्ळूर येथे बी. एल. कानशिडे यांना श्रद्धांजली
येळ्ळूर : समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. बी. एल. कानशिडे यांचे (वय ८२) नुकतेच निधन झाले. त्याबद्दल समाज शिक्षण संस्था व महाराष्ट्र हायस्कूलतर्फे शोकसभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा लिला मेणसे होत्या. कै. बी. एल. कानशिडे यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मुख्याध्यापक बी. पी. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
बेळगाव : सीमाप्रश्नाच्या दाव्यात साक्षी पुरावे घेण्यासाठी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली; पण प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात मात्र होऊ शकली नाही, अशी खंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सीमाप्रश्नाच्या दाव्याचा महाराष्ट्राने गांभीर्याने पाठपुरावा करावा, अशी आग्रही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta