Monday , September 21 2026
Breaking News

सांबरा विमानतळावर दीड लाखाची रक्कम जप्त!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव सांबरा विमानतळावर दीड लाख रुपयांची कागदपत्र नसलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
विमानतळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान कागदपत्रांशिवाय पैसे असल्याचे समोर आले. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली.
निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता दोन लाखांची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. बेळगाव सांबरा विमानतळावरून दिल्लीला जाणारा जसवीर सिंग 2 लाख रुपये घेऊन जात होता. विमानात केवळ 50 हजारांची वाहतूक करण्यास परवानगी असल्याच्या पार्श्वभूमीवर दीड लाखाची रक्कम जप्त करून उर्वरित 50 हजारांची रक्कम परत करण्यात आली. निवडणूक उड्डाण पथकाच्या नेतृत्वाखालील पथकाने ही रक्कम जप्त केली.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *