Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

फरारी कुख्यात गुंडावर बेळगाव पोलिसांचा गोळीबार

बेळगाव : बेळगाव येथील फरारी गुंडावर पोलिसांनी गोळीबार करून त्याला जखमी केले आहे. भवानीनगर येथे झालेल्या बिल्डर राजू दोड्डभोम्मनावर याच्या खून प्रकरणी फरारी असलेला गुंड विशाल सिंग चव्हाण याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. या गोळीबारात त्याच्या पायावर गोळी लागली असून तो जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी धर्मनाथ …

Read More »

विराट मोर्चाने मराठी माणसाची शक्ती दाखवून देण्याचा तालुका समितीच्या बैठकीत निर्धार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीमुळेच सीमाभागात मराठी भाषा टिकून आहे. आता आपले हक्क डावलणार्‍या कर्नाटकी प्रशासन आणि सरकारला जाब विचारण्याची वेळ आली. 27 जूनच्या विराट मोर्चाची जनजागृती झाली असली तरी, प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात मोर्चाची जागृती करावी आणि विराट मोर्चात मराठी माणसांची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

कागवाड मतदारसंघात तीन कोटींचे रस्ते

मंगसुळी-ऐनापूर, कागवाड-गणेशवाडी रस्ता कामाला प्रारंभ अथणी : कागवाड मतदार संघातील मंगसुळी-ऐनापूर रस्त्यासाठी 2 कोटी रूपये तर कागवाड-गणेशवाडी रस्त्यासाठी 1 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. माजी मंत्री व आ. श्रीमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला असून त्यांच्या हस्ते या दोन्ही रस्ताकामांना प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत हे रस्ते होणार …

Read More »

खरा धर्म समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे; जगावर प्रेम करावे : नारायण उडकेकर

मराठी विद्यानिकेतनमध्ये साने गुरुजी स्मृतिदिन साजरा बेळगांव : मराठी विद्या निकेतन बेळगावमध्ये 11 जून 2022 रोजी मराठी विद्यानिकेतन येथे साने गुरुजी स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे शिक्षक नारायण उडकेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन सावंत, मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे आणि इतर सर्व शिक्षक व विद्यार्थी …

Read More »

निसर्गाशी एकरूप होऊन जगायला शिकले पाहिजे ; पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे : वन अधिकारी श्री. विनय गौडर

माजी विद्यार्थी संघटना, एल्गार-प्रगतिशील, दमशी मंडळ बीके-ज्योती, वायसीएमयू, जेसीयेतर्फे विषेश व्याख्यान आणि वन महोत्सव साजरा बेळगाव : जनतेला कोरोना नंतर जागी करण्याची पुन्हा एकदा नितांत गरज आहे. अनेक घटकांमुळे जगभरात बदल घडून आले हे समजून घेऊन वागायला हवे. निसर्गाचा ऱ्हास झाल्यास मानवाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही यासाठी आज पर्यावरण …

Read More »

बेळगावात उद्या अर्धा दिवस शाळा

बेळगाव (प्रतिनिधी) : दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योगा दिन म्हणून साजरा केला जातो. योगा दिवसानिमित्त मंगळवारी कर्नाटकातील शाळांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच येत्या शनिवारी (25 जून) दिवसभर दिवस शाळा सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येत …

Read More »

कपिलेश्वर रेल्वे गेट पादचाऱ्यांना पूर्णपणे बंद

बेळगाव : आधीच बंद असलेल्या कपिलेश्वर रेल्वे गेटच्या म्हणजे फाटकाच्या ठिकाणी पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी खुली ठेवण्यात आलेली जागा आता सिमेंटचे पिलर घालून बंद करण्यात आल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कपिलेश्वर रेल्वे फाटक येथे उड्डाणपूल झाल्यानंतर तेथील गेट बंद करण्यात आले आहे. तथापि स्थानिक नागरिकांच्या …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात श्वेता चौगुले प्रथम

बेळगाव : शहापूर येथील विश्व भारत सेवा समितीच्या पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातून बारावीच्या परीक्षेत कु. श्वेता शिवाजी चौगुले वाणिज्य विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून तिला 548 (91%) गुण मिळाले आहेत. तर सानिका परशराम बाळेकुंद्री 532 (89%) हिने द्वितीय आणि नयन भैरव बाळेकुंद्री 479 (80%) गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांक …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज परिपत्रके मराठीतुन मिळावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाभागात 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा अंतर्भाव हवा सरकारी कागदपत्रे मराठीतूनच मिळावीत या मागणीसाठी समिती …

Read More »

युवा सेनेच्यावतीने शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा

बेळगाव : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना सीमाभाग बेळगांवची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी युवासैनिक व कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. नाथ पै चौक, शहापूर येथील नेताजी भवन येथे शिवसेना युवा सेना बेळगावची बैठक काल रविवारी पार पडली. सदर बैठकीस …

Read More »