Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

हमारा देश संघटनेतर्फे निदर्शने

बेळगाव : बेळगावातील फोर्ट रोडवर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती वीजवाहिनीवर टांगणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी हमारा देश संघटनेने केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविषयी अवमानकारक विधान केल्याचा आरोप करून त्यांची फाशी दिलेल्या अवस्थेतील प्रतिकृती …

Read More »

मोकाट कुत्र्यांनी पाडविला वानराचा फडशा : भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची शिवसेनेची मागणी

बेळगाव : मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने एका वानरावर हल्ला करून त्या वानराला अक्षरशः फाडून खाल्ले. आदर्श नगर वडगाव येथील मेघदूत कॉलनी येथे असणाऱ्या उद्याना नजीक भटक्या कुत्र्यांनी वानरावर हल्ला केला आणि त्या वानराच्या छाती आणि पोटाकडील भागाचे लचके तोडले. याआधीही बेळगाव शहर, उपनगरं आणि ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी गाई-बकरी यावरच नव्हे …

Read More »

माळी गल्ली परिसरात डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण

बेळगाव : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त माळी गल्ली युवक मंडळ व शिवाई देवी महिला मंडळ यांच्यावतीने आयोजित डेंग्यू व चिकनगुनिया लसीकरण शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. सदर शिबिराचे उद्घाटन प्रभागाच्या नगरसेविका ज्योती राजू कडोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ. हेमंत भोईटे यांच्यासह युवक मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे, प्रभाकर बामणेकर, संतोष हेब्बाळकर, भाऊराव …

Read More »

‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

बेळगाव : ‘ऑपरेशन मदत’ व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजहंसगड (येळ्ळूर गड) परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ऑपरेशन मदत, इनरव्हील क्लब, मजदूर नवनिर्माण संघ, वनविभाग सोशल फाॅरेस्ट्री व सुळगे (येळ्ळूर) ग्रामपंचायत यांच्यावतीने राजहंसगड व जांबोटी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जांभुळ, सीताफळ, चिंच, चाफा, करंज, सुबाभूळ, आंबा, वड, पिंपळ व …

Read More »

सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक चोपडे यांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील भगतसिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक के. व्ही. चोपडे हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. कंत्राटदार शिवाजी अतिवाडकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ए. ए. घोरपडे, प्राचार्य विक्रम पाटील, डी. बी. पाटील शिवाजी …

Read More »

विधान परिषदेसाठी बेळगावात मतदान

बेळगाव : विधान परिषदेच्या वायव्य कर्नाटक शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी बेळगावात मतदानाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स अवलंब करण्यात आलेला …

Read More »

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने साने गुरुजी पुण्यतिथी साजरी

बेळगाव : महात्मा गांधींचे विचार पुढे नेणारे साने गुरुजी हे ज्येष्ठ विचारवंत आणि हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांचा पिंड शिक्षकाचा असला तरी ते एक उत्तम साहित्यिक, प्रभावी वक्ता, पत्रकार आणि संपादक तसेच उत्तम भाषांतरकार अश्या अनेक भूमिकेत साने गुरुजी वावरले, असे वक्तव्य स्तंभलेखक अनिल आजगांवकर यांनी काढले. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने …

Read More »

14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स अकादमी अजिंक्य!

बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी व एमसीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि साई गार्डन व रेस्टॉरंट होनगा पुरस्कृत निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या रोजर्स क्रिकेट अकादमी संघाने पटकाविले, तर कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा अकादमी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फिनिक्स रेसिडेंशियल पब्लिक स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या …

Read More »

एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मिळविले बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद

बेळगाव : हुबळी येथे घेण्यात आलेल्या एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद मिळविले. या यशाबद्दल गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीला रोख रक्कम 2000 आणि ढाल देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन मिळविले. बेळगाव जिल्हा बुद्धीबळ …

Read More »

विधान परिषदच्या सर्व जागा जिंकू : मंत्री कारजोळ

बेळगाव : भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता 13 जून रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अत्यंत उत्साहाने पदवीधर आणि शिक्षक मतदार भाजपला पाठिंबा …

Read More »