बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी महापालिकेसमोर आज निदर्शने केली. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील दलितविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात विविध दलित संघटनांनी आज बुधवारी पालिकेसमोर आंदोलन केले. आमदार अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा छळ केल्याचा तसेच, …
Read More »संजय बेळगावकरांच्या आवाहनाला रमाकांत कोंडुसकर यांचे परखड प्रत्युत्तर
बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेच्या कारभारासंदर्भात घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर महापालिकेत सुरू झालेले वर्चस्वाचे राजकारण प्रत्येक दिवशी नवनवे वळण घेत आहे. त्यातच आज बुडाचे माजी अध्यक्ष संजय बेळगावकर यांनी, मंत्री जारकीहोळी यांनी बुडाच्या कारभाराची चौकशी करणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल एकाबाजूला चौकशीचे मी स्वागत करतो. मात्र …
Read More »येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बुधवारी
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्यादिनासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक बाल शिवाजी वाचनालय येळ्ळूर (वेशीत) बुधवार दिनांक 25/10/2023 रोजी संध्याकाळी ठिक 7-00 वाजता बोलाविण्यात आली आहे. तरी आजी- माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य व ग्राम पंचायत सदस्य, समिती कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी …
Read More »बिजगर्णी येथील श्री महालक्ष्मी यात्रा एप्रिल- मे दरम्यान होणार
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील श्री महालक्ष्मी यात्रा एप्रिल- मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प सोमवारी ग्रामस्थांनी केला. तब्बल २८ वर्षानंतर सदर यात्रा होणार असून सोमवारी गावातील सर्व देवांना गाऱ्हाणे कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. गेल्या वर्ष भरापासून धुमसत असलेला यात्रेचा विषय अखेर संपुष्टात आला. सोमवारी सकाळी गावातील ग्रामस्थ …
Read More »महिलांना शिवण क्लासचे सर्टिफिकेट वाटप
बेळगाव : विश्वकर्मा सेवा संघाची बैठक पार पडली. यावेळी या बैठकीमध्ये सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विश्वकर्मा समाजाने कशाप्रकारे पुढे यावे आणि हे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून द्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी युवा परिवर्तन या संस्थे मार्फत मीनाताई बेनके यांच्याहस्ते शिवण क्लासचे सर्टिफिकेट महिलांना देण्यात आले. …
Read More »वारकरी संप्रदाय जगात श्रेष्ठ आहे : माजी आमदार महांतेश कवटगीमठ
येळ्ळूरमध्ये नेताजी युवा संघटनेच्या वतीने आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन येळ्ळूर : वारकरी सांप्रदाय जगात श्रेष्ठसंप्रदाय आहे, संत तुकाराम महाराजांनी व्यसनमुक्त समाजासाठी कार्य केले, त्याचप्रमाणे नेताजी युवा संघटनेच्या वतीने सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी या ठिकाणी संगीत भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे ही कौतुकास्पद बाब आहे. विठोबा हा गरिबांचा देव आहे, युवकांना …
Read More »दसरा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
बेळगाव : गेल्या दोन दशकांपासून बेळगावातील वैशिष्ट्य ठरलेल्या बेळगाव शहर देवस्थान कमिटी व श्री देवदादा सासनकाठी ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या दसरा महोत्सवाची गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मराठी विद्यानिकेतन येथील दसरा मैदानावर दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी सायंकाळी सहा वाजता ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या दसरा महोत्सवाचे …
Read More »अबकारी खात्याची कारवाई; पिरनवाडी क्रॉस येथे 43.93 लाखाची दारू जप्त
बेळगाव : अबकारी खात्याच्या पथकाने पिरनवाडी क्रॉस येथे गोव्याहून दारूची बेकायदा वाहतूक करणारी एक लॉरी आणि तिच्यात दडविलेली 43 लाख 93 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण 63,93,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना आज पहाटे घडली. बेळगावचे अप्पर अबकारी आयुक्त डॉ वाय. मंजुनाथ, अबकारी जंटी आयुक्त फिरोज खान, …
Read More »काळ्यादिनाच्या सायकल फेरीत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन बेळगाव : मराठी सीमाभाग अन्यायाने १ नोव्हेंबर १९५६ रोजी तात्कालीन म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे गेल्या ६७ वर्षापासून आपण काळा दिन गांभीर्याने हा काळा दिन सुतक दिन म्हणून पाळत असतो. येत्या एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीत सीमाभागातील …
Read More »आ. अभय पाटील पालिका आयुक्तांना ब्लॅकमेल करत आहेत : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : आ. अभय पाटील छोट्या गोष्टींना मोठे करत आहेत. पालिका आयुक्तांना ते ब्लॅकमेल करत आहेत. बेळगावच्या महापौर सोमनाचे या आमदार अभय पाटील यांच्या हातचे बाहुले बनल्या आहेत असा सनसनाटी आरोप सार्वजनिक बांधकाम खात्याचे व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केला. बेळगाव महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉलमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री जारकीहोळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta