Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

बेळगावात एम्स रूग्णालय उभारण्याची आपची मागणी

बेळगाव : बेळगावमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संस्थेचे (एम्स) रुग्णालयात उभारण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगाव शाखेने प्रशासनाकडे केली आहे. बेळगावमध्ये एम्सचे रुग्णालय झाले तर बेळगांव जिल्ह्यातील गरीब जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळेल. बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारा जिल्हा आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील जनतेलाही अत्याधुनिक वैद्यकीय सोई …

Read More »

आरोग्याधिकारी मुन्याळ यांची तडकाफडकी बदली!

बेळगाव : बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांची सरकारने कोणतेही कारण न देता तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी डॉ. महेश कोणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. …

Read More »

पांढऱ्या जास्वंदीच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल!

बेळगाव : निसर्गाचा चमत्कार आपल्याला नेहमी पाहायला आणि अनुभवायला मिळतो. निसर्गाचा चमत्कार थक्क करणारा असतो. आता हेच पहा ना पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या झाडाला चक्क गुलाबी रंगाचे जास्वंदीचे फूल उमलले आहे. कोठे घडला आहे हा निसर्गाचा चमत्कार असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पुढे वाचा….. शहापूर आचार्य गल्लीमध्ये पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या …

Read More »

आमदारांनी झाडले… घराचे पैसे मंजूर झाले…

दिव्यांगाच्या घराचे स्वप्न साकार : कृष्णा कित्तूरला जाऊन जागेवरच फैसला अथणी : दोन वर्षांपूर्वी महापुरात घर वाहून गेले… शासनाने नवीन घर मंजूर करत दोन हप्ते देखील दिले. परंतु, तिसर्‍या हप्त्यासाठी दोन वर्षांपासून हेलपाटे मारूनही अधिकार्‍यांना पाझर फुटला नाही. शेवटी वैतागलेल्या या गरीब शेतकर्‍याने कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांची भेट घेऊन …

Read More »

वाढीव शुल्क, डोनेशन विरोधात अभाविपची निदर्शने

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांचे वाढलेले शैक्षणिक शुल्क, डोनेशनच्या विरोधात अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेतर्फे बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. वाढीव शुल्क आणि डोनेशनला लगाम घालण्याची मागणी अभाविप कार्यकर्त्यांनी यावेळी केली. गुरुवारी सकाळी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात अभाविप कार्यकर्त्यांनी प्रचंड महागलेले शैक्षणिक शुल्क आणि डोनेशनच्या विरोधात भव्य आंदोलन छेडले. अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी …

Read More »

वादाच्या भोवऱ्यात अडकलेली खानापूर समिती!

एकीत खोडा घालणाऱ्यांना वेळीच आवरा बेळगाव : खानापूर समितीची बिनशर्त एकीची घोषणा हवेतच विरली. दि. 24 एप्रिल रोजी हब्बनहट्टी येथे म. ए. समितीची बिनशर्त एकीची घोषणा झाली खरी पण ती घोषणाही फक्त घोषणाच राहिली. 2018 च्या विधानसभेच्या वेळी दोन गटात विखुरलेली समिती एकत्र यावी यासाठी तालुक्यातील समितिनिष्ठ कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ …

Read More »

एनइपी अभ्यासक्रमात कौशल विकासावर भर असावा : डॉ. थिम्मेगौडा

पदवी अभ्यासक्रमाबाबत बेंगलोर येथे बैठक बेंगळूर : पदवी शिक्षणासाठी एनईपी अभ्यासक्रम लागू करण्यात कर्नाटक राज्य आघाडीवर असून यापुढील भाषा अभ्यासक्रमातही कौशल विकासावर अधिक भर असावा अशी सूचना कर्नाटक राज्य उच्च शिक्षण आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. थिम्मेगौडा यांनी केली. बेंगळूर येथे आयोगाच्या कार्यालयात बुधवारी पदवी अभ्यासक्रमासाठी द्वितीय वर्षाचा हिंदी अभ्यासक्रमाचा आराखडा ठरविण्यासाठी …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत तज्ञ समितीची बैठक संपन्न

पुढील बैठक आठ जुलैच्या आधी होणार बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीची बैठक आज सायंकाळी जलसंपदामंत्री श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस समितीचे सभासद श्री. राम आपटे, श्री. राजाभाऊ पाटील, श्री. दिनेश ओऊळकर, सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर सचिव सौ. सुजाता सौनिक, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चा अनोखा कार्यक्रम

बेळगाव : 4 जून 2022 हा दिवस मुख्यत्वे मुलांचा संरक्षण दिवस. जोर जबरदस्तीचे बळी म्हणून जागतिकरित्या सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे अध्यक्ष श्री. शिव कुमार हिरेमठ, संचालक श्री. पद्म प्रसाद हुली अन्य श्री. राहुल पाटील (एनजीओ) व एसडीएमसीचे अध्यक्ष यांनी नुकतीच …

Read More »

क्रिजवाईज समूहातर्फे कामगारांच्या मुलांचा गौरव

बेळगाव : आपल्या दुकानातील कामगारांच्या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याचा स्तुत्य उपक्रम येथील क्रिजवाईज टेलर्सच्या वतीने राबविण्यात आला. यावेळी सोमवारी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या पाच मुलांना रोख रक्कम पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिजवाईजचे मालक श्री. कृष्ण भट यांनी प्रतिक्षा हेगडे (महिला विद्यालय …

Read More »