Monday , March 9 2026
Breaking News

बेळगाव

संजीवीनी फौंडेशनमध्ये हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशन येथे हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला. तालुका आरोग्य कार्यालयातील आशा कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या. आशा कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना डॉ. सरनोबत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून अशीच समाजाची सेवा करत रहा असे सांगितले. …

Read More »

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची येळ्ळूर गावामध्ये जल्लोषात मिरवणूक

  येळ्ळूर : महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ मूर्तीची मिरवणूक येळ्ळूर गावांमध्ये सोमवार तारीख 19 रोजी अगदी जल्लोषी वातावरणात, शेकडो शिवभक्त, आबालवृद्ध, महिला व मुले यांच्या उपस्थितीत भगवे मय वातावरणात काढण्यात आली. मिरवणकीला सकाळी 12:00 वाजता सैनिक भवन येळ्ळूर येथून सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये …

Read More »

रेल्वे स्थानकावर “ती” शिल्प उभारण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेट!

  बेळगाव : येत्या 15 दिवसाच्या आत बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय जागी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत श्री बसवेश्वर यांची शिल्प बसविण्यात यावीत. अन्यथा भीमसैनिक, शिवसैनिक आणि बसव सैनिक संयुक्तरीत्या स्वतः येऊन ही शिल्प लावतील. त्यावेळी आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला किंवा गोळ्या घातल्या तरी कोणत्याही परिस्थितीत शिल्प …

Read More »

महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयात चोरी

  बेळगाव : बेळगाव येथील बसवेश्वर सर्कलजवळील बेळगाव महापालिकेच्या दक्षिण विभागाच्या महसूल शाखेत चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. महापालिकेच्या गोवावेस येथील विभागीय कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला व लॅपटॉप चोरून पलायन केले. त्यांनी मालमत्ता मालकीचे कागदपत्र, मालमत्ता मालकाचे ओळखपत्र, कर प्रमाणपत्र, बांधकाम परवाना यासह …

Read More »

विना हेल्मेट वाहन चालकांचा लायन्सस रद्द करा : पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा

  बेळगाव : बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी, चालू वर्षात संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरातील अपघात किमान 25% कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सोमवारी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांचा वाहन …

Read More »

सायबर सुरक्षेबाबत बँकांना मार्गदर्शन!

  बेळगाव : आपल्या ग्राहकांच्या पैशांची सुरक्षितता ही प्रत्येक बँकेची स्वतःची जबाबदारी आहे, त्यामुळे बँकांनी आपले कर्मचारी आणि संचालक मंडळांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. असा आदेश अलीकडेच भारतीय रिझर्व बँकेकडून काढण्यात आला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन बेळगावातील मराठा बँक, पायोनियर बँक आणि तुकाराम बँक या तीन बँकांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल येळ्ळूरचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

  येळ्ळूर : जनसेवा मित्रमंडळ संचलित ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल, येळ्ळूर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सैनिक भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे माजी चिटणीस किरण जाधव, येळ्ळूर क्लस्टरचे सीआरपी महेश जळगेकर, बेळगाव महापालिकेच्या माजी उपमहापौर मीना वाझ, बेळगाव जिल्हा बुद्धीबळ संघाचे सचिव …

Read More »

चलवेनहट्टी येथे शिवजयंती उत्साहात

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीनं हनुमान चौकात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमांची सरूवात करण्यात आली. शिव मुर्तीचे पुजन बाबु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन नारायण पाटील तसेच यल्लाप्पा कितवाडकर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले तर हनुमान मुर्तीचे …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात…

  बेळगाव : शहापूर येथील पंडित नेहरू हायस्कूल माध्यमिक शाळेचा स्नेह संमेलन सोहळा 15/02/2024 रोजी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळ्ळी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषिविले. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ बेळगांवचे डायरेक्टर श्री. अशोक नाईक, सी.आर पी. संतोष …

Read More »

निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार

  खानापूर : खैरवाड ता.खानापूर येथील रहिवासी व निवृत्त मुख्याध्यापक श्री. रमाकांत व्ह. पाटील यांना ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचा “ज्ञानवर्धिनी जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. रमाकांत पाटील यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात १७ सप्टेंबर १९४७ रोजी झाला, त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण खैरवाड येथे झाले, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर …

Read More »