Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

विधान परिषद निवडणुकीत विजय भाजपचाच : नलीनकुमार कटील

बेळगाव : राज्यात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांचाच विजय होईल, तसेच बेळगाव भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असा विश्वास भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी व्यक्त केलाय. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार अर्ज भरण्यासाठी भाजप राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील बेळगावमध्ये आले होते. नलीनकुमार कटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव, विजापूर, बागलकोट …

Read More »

विधान परिषद निवडणुकीसाठी बेळगावमध्ये भाजप मेळावा

बेळगाव : राज्यात होऊ घातलेल्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भाजप मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता. वायव्य पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार हनुमंत निराणी आणि शिक्षक मतदारसंघाचे अरुण शहापूर यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यानंतर …

Read More »

मराठा फेडरेशनचा भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा : श्यामसुंदर गायकवाड

बेळगाव : कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली वीस वर्ष सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्‍वासने देत आहे. राज्यातील विद्यमान भाजप सरकार मराठा समाजाचा राजकीय वापर करून घेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता केली जावी. यासाठी सरकारला 25 जूनपर्यंत मुदत दिली जात आहे. …

Read More »

मराठी परिपत्रके मोर्चा प्रकरणी दीपक दळवींसह ३१ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २५ ऑक्टोबर २०२१ रोजी मराठीतून परिपत्रके व कागदपत्रे द्यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला होता. हा मोर्चा विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप करत मोर्चा रोखुन धरण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला पण उपस्थित कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले होते. त्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका …

Read More »

एम्स संस्थेचे बेळगावात केंद्र स्थापनेसाठी निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. जगभरात नावाजले गेलेले भारतामधील एक नामवंत वैद्यकीय शिक्षण केंद्र अशी या संस्थेची ओळख आहे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या रूग्णांवर उपचार होत असतात. या संस्थेचे केंद्र बेळगावात स्थापन व्हावे, अशी मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या …

Read More »

शहरातील 12 ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची झाडाझडती

बेळगाव : शहर उपनगर परिसरात रहदारी पोलीसांची कारवाई नेहमीच पाहायला मिळत असते. मात्र आज गुरुवारी सायंकाळी बेळगाव शहर आणि उपनगरातील एकूण बारा ठिकाणी रहदारी पोलिसांनी अचानकपणे वाहनधारकांची झाडाझडती सुरू केली. त्यामुळे वाहनधारकांची एकच तारांबळ पाहायला मिळाली. शहर उपनगरातील विविध महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यांवर रहदारी पोलिसांनी आज अधिकाऱ्यांसह ठिय्या मांडलेला दिसून …

Read More »

जायंट्सचा स्तुत्य उपक्रम; दोन गरीब विद्यार्थ्यांना दत्तक

बेळगाव : कोरोनामध्ये पितृछत्र हरवलेल्या अंकिता व अनिकेत या दोन विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून जायंट्स ग्रुप बेळगाव (मेन) च्या वतीने त्या दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले. त्यांचे वडील दीपक देशपांडे यांचे 2021 मध्ये तामिळनाडू येथे कोरोनाने निधन झाले. ही दोन्ही मुले आता येथे आई समवेत राहतात. …

Read More »

आंबा महोत्सवास उत्साहात प्रारंभ

बेळगाव : शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत आंब्याची विक्री करता यावी याकरिता बेळगावचे बागायत खाते आणि कोल्हापूर येथील पणन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवाला आजपासून बेळगावात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. क्लब रोड येथील ह्यूम पार्क येथे या आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध जातींच्या आंब्यांचे प्रदर्शन …

Read More »

मालवाहू वाहनाचा ब्रेक फेल होऊन अपघात; सुदैवाने प्रवासी बचावले!

बेळगाव : बेळगावमधील चन्नम्मा सर्कलमध्ये गुरुवारी सकाळी थरारक अपघात झाला, ज्यामुळे सर्वांच्याच काळजात धस्स झाले. ब्रेक फेल झाल्याने मालवाहू वाहनाने बसला धडक दिली परंतु सुदैवानेच प्रवासी बचावले. बेळगावातील चन्नम्मा चौकात गुरुवारी सकाळी काळजात धडकी भरविणारा विचित्र अपघात झाला. एका मालवाहू वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने समोरील वाहनाला धडक दिली. त्यानंतर समोरील …

Read More »

मार्केट स्टॉलसाठी २० जून रोजी लिलाव

बेळगाव : कॅण्टोन्मेंट बोर्डाने आपल्या हद्दीतील बीफ, मटण आणि पोर्क मार्केटमधील स्टॉल भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला आहे. एक वर्षाच्या मुदतीसाठी हा लिलाव असून २० जून रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. थकबाकीदारांना लिलावात सहभागी होता येणार नाही. स्टॉल्स हस्तांतरित केल्यापासून एक वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातील. लिलावात सहभागी होऊ …

Read More »