Monday , September 21 2026
Breaking News

श्री दुर्गाशक्ती महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : श्री दुर्गाशक्ती महिला मंडळतर्फे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाला एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष सौ. मीनाताई बेनके तसेच भारतीय जनता पक्षाचे श्री. मुरगेंद्रगौडा व प्रभागाचे नगरसेविका सौ. नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका सौ. वैशाली हुलजी, सौ. प्रज्ञा शिंदे तसेच श्री एकदंत युवक मंडळाचे श्री. अरुण गावडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता श्री एकदंत सांस्कृतिक भवन समर्थ नगर येथे पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी प्रमुख पाहुण्या सौ. मीनाताई बेनके व श्री. मुरगेंद्रगौडा, नगरसेविका सौ. नेत्रावती भागवत, माजी नगरसेविका सौ. वैशाली हुलजी, प्रज्ञा शिंदे, श्री. अरुण गावडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना सौ. मीनाताई बेनके व श्री मुरगेंद्रगौडा, नगरसेविका सौ. नेत्रावती भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर महिलांना हळदीकुंकू व वान देऊन हा हळदीकुंकूचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी बोलताना श्री. एकदंत युवक मंडळाचे श्री. अरुण गावडे यांनी या महिला मंडळाचे कौतुक करून त्यांना पुढे पण महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम करण्याचे सल्ला दिला. यावेळी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ. माला कणेरी, उपाध्यक्ष मंगला गावडे व असंख्य महिला उपस्थितीत होत्या. सूत्रसंचालन सौ. मनीषा कुंडेकर यांनी केले तर सौ. सरला उचगावकर यांनी आभार व्यक्त केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *