Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

फेसबूक फ्रेंड सर्कलने केली लग्नासाठी मदत

बेळगाव : भवानीनगर येथील एका कुटुंबियांना लग्नासाठी मदत देण्यात आली आहे. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने सदर मदत देण्यात आली आहे. भवानीनगर टिळकवाडी येथील एका आजीच्या नातवंडाचे लग्न आज आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने फेसबुक फ्रेंड सर्कलने या कुटुंबियांना लग्नासाठी लागणारे साहित्य, नातवंडेसाठी लागणारी साडी, आजोबांसाठी लागणारे कपडे तसेच मंगळसूत्र वाट्या …

Read More »

३१ रोजी शहर व उपनगरात वीजपुरवठा खंडित

बेळगाव : दुरुस्ती कामामुळे मंगळवार दि. ३१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत शहर व उपनगरात वीजपुरवठा खंडित होणार आहे, अशी माहिती हेस्कॉमने दिली आहे. धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारुती गल्ली, गोवावेस, मराठा कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, पहिले रेल्वेगेट, नेहरु रोड, सावकर रोड, रॉय …

Read More »

करंजाळ रस्त्याची दुरावस्था; तालुका विकास आघाडीकडून पाहणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंजाळ गावाला जाणाऱ्या रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. याची दखल घेऊन खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी नुकताच रस्त्याची पाहणी केली. गेल्या १८ वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी वनखात्याने अक्षेप घेऊन काम करण्यास विरोध केला होता. परंतु स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नाने …

Read More »

जायंट्स सखीतर्फे मळेकरणीदेवी मंदिर परिसरात डस्टबीनचे वितरण

बेळगाव : उचगाव येथील जागृत मळेकरणीदेवीची दर मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रा भरत असते. या यात्रेदरम्यान हजारो भाविक याठिकाणी भेट देत असतात. यावेळी प्रासादिक भोजन होत असते. पण स्वच्छतेच्या बाबतीत भाविकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, आपण केलेला कचरा ही आपली जबाबदारी असते, त्याचा व्यवस्थित निचरा होणे गरजेचे असते पण मंदिर परिसर …

Read More »

कावळेवाडीत होणार विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

बेळगाव : कावळेवाडी (ता.बेळगाव) राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयाच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (ता. २९) सकाळी १०.३० वाजता प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. जत्ती शिक्षा महाविद्यालयाच्या प्रा. मनिषा नाडगौडा असतील. महात्मा फोटो पूजन ग्रामस्थ मंडळ चेअरमन जोतिबा मोरे, संत ज्ञानेश्‍वर …

Read More »

केएसआरपी पोलीस कॉन्स्टेबल टास्क फोर्सचा शपथविधी सोहळा दिमाखात

बेळगाव : कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलाचा हा विभाग अत्यंत शिस्तबद्ध विभाग आहे. अतिशय मजबूत अशा या पोलीस यंत्रणेत कर्तव्य बजावताना जात, पंथ, धर्म आड येता कामा नये. सर्वांनी दृढ संकल्पासह कर्तव्याचे पालन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. हितेंद्र यांनी केले. बेळगावातील कंग्राळी खुर्दनजिकच्या कर्नाटक राज्य राखीव …

Read More »

बेळगावात हिंदू जनजागरण समितीची दिंडीयात्रा

बेळगाव : सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मदिनानिमित्त बेळगावात आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने भव्य हिंदु एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी बेळगावातील शहापूरातील बॅ. नाथ पै सर्कलपासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत हिंदू राष्ट्र एकता दिंडी यात्रा काढण्यात आली. सजवलेल्या वाहनात सनातन संस्थेचे संस्थापक गुरू डॉ. जयंत आठवले …

Read More »

हलगा ग्राम पंचायत अध्यक्षपदी सदानंद बिळगोजी यांची निवड

बेळगाव : हालगा (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सदानंद बसवंत बिळगोजी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड जाहीर होताच बिळगोजी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होण्याबरोबरच समर्थकांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. हालगा ग्रामपंचायत नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदानंद बसवंत बेळगोजी यांचा श्री धर्मराज मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने उत्स्फूर्त सत्कार करण्यात …

Read More »

हुतात्मा अभिवादनासंदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन

बेळगाव : हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी येत्या बुधवार दि. 1 जून रोजी आयोजित हुतात्म्यांना अभिवादन करण्याच्या कार्यक्रमासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन कार्यक्रमाची कल्पना देणारे निवेदन त्यांना सादर केले. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या बुधवारी 1 जून रोजी सकाळी …

Read More »

बेळगावमध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 25 मेपासून

बेळगाव : केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दि. 25 ते 29 मे 2022 या कालावधीमध्ये एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक उमेश कलघटगी यांनी दिली …

Read More »