Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

लाचखोर तलाठी एसीबीच्या ताब्यात

बेळगाव : जमिनीसंदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रंगेहात पकडले. जगदीश कित्तूर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे गणकोडी तोट शिरगूर रस्ता, चिंचली येथील सचिन शांतिनाथ उर्फ शांतू शिंदे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या …

Read More »

विकासकामे राबविण्याकरिता आमदार अनिल बेनके यांनी घेतली नागरिकांची बैठक

बेळगाव : यंदाच्या वर्षी शहरातील सर्व विकासकामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तरचे आमदार अनिल बेनके उपाययोजना राबवित आहेत. तसेच शहरातील उत्तर भागाची पाहणी करून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता सज्ज झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकरिता आणि त्यांच्या भागात विकासकामे राबविण्याकरिता उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी काल नागरिकांच्या भागात …

Read More »

राजश्री तुडयेकर डॉक्टरेट पदवीने सन्मानित

बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या असामान्य सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राजश्री राजेश तुडयेकर यांना नवी दिल्ली येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात ‘प्राऊड इंडियन पार्लिमेंट अवॉर्ड -2022’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह रॉयल अमेरिकन युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. रफी मार्ग, नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन अल …

Read More »

‘सप्तपदी विवाह’तर्फे ब्राह्मण, मराठा वधू-वर मेळावा

बेळगाव : ‘लग्न पाहावे करून’ या उक्तीप्रमाणे आज आपल्या समाजातही लग्नाची समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. बदलत्या समीकरणांनी वधू-वर संशोधनालाही वेगळे वळण दिले आहे. वधू-वरांची शिक्षण, स्वावलंबन, जीवनशैली, त्यांचे प्राधान्यक्रम पाहता ही प्रक्रिया आधीएवढी सोपी नक्कीच राहिली नाही. वधू-वरांचे एकमेकांना येणारे नकार, पालकांची होणारी तारांबळ हे सगळे संशोधनप्रक्रियेतील वाढणारे गोंधळ कमी …

Read More »

कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

बेळगाव : जालगार गल्ली, बेळगाव येथील श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा रौप्यमहोत्सव भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आला होता. या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात शहापूर अंबाबाई देवस्थान येथून सुरु झालेली पदयात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून ढोलताशा पथकाच्या तालावर नाथ पै सर्कल, खडेबाजार, शहापूर, विठ्ठलदेव गल्ली, बसवण गल्ली, होसूर जयशंकर भवन मार्गे मार्गस्थ झाली. …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

बेळगाव : काल सोमवारपासून कर्नाटक राज्यात शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे पहिली ते पाचवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व वह्या वाटप कार्यक्रम सरकारी प्राथमिक शाळा भवानीनगर बेळगाव येथे आयोजित केला होता. कार्यक्रम व्यासपीठावर जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सेक्रेटरी मुकुंद महागावकर, संचालक धीरेंद्र मरळीहळी …

Read More »

श्रीपंत विवाह सोहळ्यासह, श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता

बेळगाव : श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री यांच्यावतीने दिनांक 14 ते 17 मे दरम्यान श्रीपंत बोधपीठ वासंतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज मंगळवारी 17 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधींबरोबर श्रीपंत विवाह सोहळ्याने श्रीपंत गुरुचरित्र पोथी वाचन शिबिराची सांगता झाली. सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीपंत गुरुचरित्र पोथी सामुदायिक वाचन शिबिर, श्रीपंत …

Read More »

येळ्ळूर येथील नाला झाला स्वच्छ….

बेळगाव : येळ्ळूरमधील सांबरेकर गल्लीतील नाला पावसाळा चालू होण्याआधी स्वच्छ करण्यात आला. कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला नाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या भागातील ग्राम पंचायत सदस्याना बरोबर घेऊन नाला स्वच्छ केला व गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य …

Read More »

बेळगावच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी यांची सुवर्ण भरारी!

बेळगाव : बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे. बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे …

Read More »

समाजात सकारात्मक विचारांचे बीज माध्यमांना पेरावे लागेल : राजयोगी श्रीनिधी

बेळगाव : संपूर्ण जगात अशांतता पसरलेली पाहायला मिळत आहे. भेदभाव हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. अशा काळात तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याचे आव्हान उभे आहे. समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचे काम माध्यमांना करावे लागेल, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पीस ऑफ माईंड टीव्हीचे निवेदक राजयोगी श्रीनिधी यांनी बोलताना केले. …

Read More »