Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन)तर्फे उत्कृष्ट कामगारांचा सत्कार समारंभ

बेळगाव : प्रत्येक देशाचा कामगार मग तो कोणत्याही स्तरावरचा असू दे, तो त्या देशाचा पाठीचा कणा असतो. हा कणा जर आणखीन सदृढ करायचा असेल तर कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे हे राष्ट्रीय कार्य आहे, असे मत जायंट्सचे अध्यक्ष श्री. शिवकुमार हिरेमठ यांनी आयोजित उत्कृष्ट कामगार गौरव सत्कार समारंभप्रसंगी व्यक्त केले. …

Read More »

हिंडलगा येथे शिवशाहीर पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न

हिंडलगा : श्री महालक्ष्मी नगर हिंडलगा येथे शिवजयंतीनिमित्त शिवशाहीर पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर वेंकटेश देवगेकर यांनी त्यांच्या पोवाड्याने सर्वांना शिवशृष्टी अनुभूती करून दिली. हा कार्यक्रम श्रीरामसेना हिंडलगा व युवक मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय पाटील, भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष …

Read More »

व्हीडीआयटीचा स्थापना दिन उद्या

बेळगाव : कर्नाटक लॉ सोसायटी संचालित विश्वनाथराव देशपांडे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा (व्हीडीआयटी) स्थापना दिन 11 मे रोजी दुपारी 3 वाजता संस्थेच्या आवारात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हीटीयूचे कुलगुरु डॉ. करिसिद्धाप्पा तर निमंत्रित म्हणून सोसायटीचे विश्वस्त आर. व्ही. देशपांडे, व्हीटीयूचे कुलसचिव डॉ. ए. एस. देशपांडे, डॉ. बी. …

Read More »

व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान : प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी

बेळगाव : आजच्या युगात प्रत्येक विद्याशाखेत गणित हा मूलभूत विषय आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्व क्षेत्रात गणित महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे गणिताला सर्व विषयाची राणी म्हणतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी यांनी केले. मराठा जागृती निर्माण संघातर्फे …

Read More »

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बेळगावात आगमन; गोगटे कुटुंबियांचे केले सांत्वन

बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मंगळवारी सकाळी बेळगावात आगमन झाले. आपल्या दोन दिवसीय दौर्‍यात जिल्ह्यातील विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे दोन दिवसीय दौर्‍यावर बेळगावात आज सकाळी आगमन झाले. उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गोगटे …

Read More »

गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ उत्साहात

छत्रपती संभाजीराजे यांची उपस्थिती बेळगाव : दि. 15 मे रोजी सकल मराठा समाजातर्फे होऊ घातलेल्या गुरुवंदना कार्यक्रमाची मुहूर्तमेढ आज दि. 9 मे रोजी सायंकाळी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर करण्यात आली. समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या हस्ते महूर्तमेढ करण्यात आली. यावेळी शंकर बाबली यांनी पौरोहित्य केले. गुरुवंदना कार्यक्रमासाठी आदर्श विद्या मंदिराच्या पटांगणावर भव्य …

Read More »

जायंट्स आय फौंडेशनच्या माध्यमातून वासुदेव हरी टोपले यांचे मरणोत्तर नेत्रदान

बेळगाव : मूळचे सावंतवाडी येथील वासुदेव हरी टोपले यांचे बेळगाव येथे येळ्ळूर केएलई इस्पितळात वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ८८ वर्षाचे होते. त्यांच्या निधनानंतर जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांना माहिती मिळाल्यानंतर लागलीच त्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधला व मध्यरात्री त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात …

Read More »

मराठा बँकेचा बुधवारी अमृत महोत्सव; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची उपस्थिती

चेअरमन दिगंबर पवार यांची माहिती बेळगाव : बेळगाव परिसरातील बहुजन समाजाचा मानबिंदू असलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बुधवार दिनांक 11 मे रोजी मराठा बँकेचा अमृत महोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या अध्यक्षतेद्वारे होणाऱ्या, कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित …

Read More »

कर्नाटक : सर्व एक्स्प्रेससाठी तिकीट काऊंटर सुरु; दोन वर्षांनंतर प्रतीक्षा संपली

बेळगाव : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांसाठी आता तिकीट काऊंटर सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ दोनच एक्स्प्रेस गाड्याना रेल्वेचा प्रवासी तिकीट आणि मासिक पास सुरु करण्यात आला होता. आता पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मे महिन्यापासून टप्प्याटप्याने 9 एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्रवाशांना रेल्वे पास आणि तिकीट …

Read More »