Monday , March 9 2026
Breaking News

बेळगाव

पालकमंत्री सतीश जारकीहोळीना धमकीपत्र देणाऱ्याला कठोर शिक्षा द्या

  दलित संघटनांचे आंदोलन: जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना धमकीपत्र देणाऱ्या विरोधात कठोर शिक्षा व्हावी. शिवाय याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी व्यक्तींनी पत्र पाठवून जिल्हा पालकमंत्री सतीश जरकीहोळी यांना थेट धमकी दिली आहे. एवढी …

Read More »

संघटितपणे संविधानाचा हक्क मिळवणे चूकीचे कसे? : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बेळगावातील राष्ट्रीय समावेश मेळाव्यात सत्कार स्विकाताना व्यक्त मत बेळगाव (प्रतिनिधी) : देशातील सर्व समाज एक सारखेच असून, आजपर्यंत आम्हीं कधीही जातीभेद केला नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊनच चाललो आहोत. सरकार संविधानाच्या चौकटीतच सर्व समाजाना एकच न्याय दिला जाईल, असे सांगत कोणत्याही समाजाने संघटिपणे हक्क मागितला तर त्यात चुकीचे काय …

Read More »

दिल्ली -बेळगाव विमानसेवा 5 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू

  बेळगाव : वर्षभरापासून बंद पडलेली दिल्ली -बेळगांव विमानसेवा आता पुन्हा 5 ऑक्टोबर पासून नव्याने सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव ते मुंबई ही विमानसेवा येत्या 15 ऑक्टोबर पासून बेळगावकरांच्या सेवेत असणार आहे. इंडिगो विमान कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमानसेवा सुरू केली असून या कंपनीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नवी दिल्ली ते …

Read More »

कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या पुढाकाराने प्लास्टिक मुक्तीचे अभियान

  बेळगाव : स्वच्छ भारत अभियांनातर्गत ‘ऑपरेशन मदत’ ग्रूप या संस्थेच्या सहकार्याने कॅन्टोन्मेंट शाळेने पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज आहे ओळखून, शाळेमध्ये प्लास्टिक मुक्तीचे अभियान सुरू केले आहे. संपूर्ण जग हे दिवसेंदिवस प्लास्टिकच्या विळख्यात जखडले जात आहे. त्याच्या दुष्परिणामाची कल्पना विद्यार्थ्यांना बाल वयापासूनच व्हावी व पर्यावरण संवर्धनात विद्यार्थ्यांचाही सहभाग असावा …

Read More »

शब्दगंध कवी मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी “शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे” आयोजन

  वर्धापन दिनानिमित्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटाकरिता आयोजन बेळगाव : बेळगाव येथील शब्दगंध कवी मंडळ गेली ३३ वर्षे मराठी कविता आणि कवींसाठी कार्यरत आहे. मंडळातर्फे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेळगावातील काव्य परंपरा समृद्ध करण्याचे कार्य करते आहे. ३३व्या वर्धापन दिनानिमित्त ‘शब्दगंध काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

भारत विकास परिषदेची आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा रविवारी अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत किशोर काकडे उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. व्ही. एन्. जोशी, विभागीय सचिव पांडुरंग नायक, कर्नाटक प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर, संयोजक डाॅ. जे. जी. नाईक, बेळगांव …

Read More »

समाजातील चांगल्या कामांचे कौतुक प्राधान्याने करा : गणेश शिंदे

  संजीवनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त व्याख्यान बेळगाव : समाजात खूप काही चांगली कामे सुरु असतात, खूप जण समाज बदलासाठी प्रयत्न करत असतात, मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या कमी आहे. समाजात जे चांगले आहे, ते चांगले मानून त्यांना पाठिंबा द्या. संत तुकाराम यांनी शब्द हे शस्त्र आहेत, त्या शब्दांचा वापर …

Read More »

‘स्वाभिमानी’ संघटना शाखेचे शेंडूर येथे उद्या उद्घाटन

  निपाणी (वार्ता) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कार्यरत असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता.१) सायंकाळी ६ वाजता शेंडूर येथे सिध्देश्वर मंदिरा जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियान आणि शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. तरी परीसरातील …

Read More »

पशुवैद्यकीय खात्यातर्फे ‘जागतिक रॅबीज दिन’ साजरा

  बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत, पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खाते बेळगाव आणि जिल्हा प्राणी दया संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवारी विविध उपक्रमांनी ‘जागतिक रॅबीज दिन’ साजरा करण्यात आला. हॉटेल सन्मान समोरील पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये आयोजित या जागतिक रॅबीज दिन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू …

Read More »

रिंगरोड विरोधातील शेतकऱ्यांची सोमवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात नियोजित रिंगरोडला बेळगाव शेतकऱ्यांनी न्यायालयीन स्थगिती घेतली आहे. यामुळे या स्थगिती संदर्भात व रिंगरोड रद्द करण्यासंदर्भात शेतकऱ्यांची बैठक बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कॉलेज रोड (पवन हॉटेलच्या बाजूला) कार्यालयात सोमवार दिनांक २ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना रिंगरोड …

Read More »