बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परंपरेनुसार वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २६) संध्याकाळी चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी तयारी केली आहे. वडगाव परिसरात शहराच्या एक दिवस आधी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येते. यंदा शहराची शनिवारी (दि. २७) चित्ररथ मिरवणूक निघणार आहे. त्यामुळे शुक्रवारी वडगाव परिसरातील चित्ररथ …
Read More »उद्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी शनिवारी (दि. २७) शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. राणी चन्नम्मा चौकातून खानापूरकडे जाणारी वाहने क्लब रोडमार्गे गांधी सर्कल, शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्र. २, शर्कत पार्क, …
Read More »बेळ्ळारी नाल्याची साफसफाई म्हणजे शेतकऱ्यांना भकास करण्याचे षडयंत्र
बेळगाव : पावसाळ्यात पावसाचे पाणी बेळ्ळारी नाल्यातून न जाता परिसरातील शेत जमिनीमध्ये जाते. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. संभाव्य परिस्थिती ओळखून नवनिर्वाचित सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण संबंधित अधिकाऱ्यांनी करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार बेळ्ळारी नाल्याची सफाई करण्यात येत आहे पण …
Read More »बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी घेतली मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. केपीसीसी कार्याध्यक्ष व नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगावच्या आमदारांचे शिष्टमंडळ सध्या राजधानी दिल्लीत ठाण मांडून आहे. या शिष्टमंडळात सतीश जारकीहोळी यांच्यासोबत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, …
Read More »शिवजयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय
बेळगाव : बेळगाव शहरात येत्या शनिवारी काढण्यात येणारी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणूक शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्णय मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ पदाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत आज घेण्यात आला. बेळगावात आज शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »‘शांताई’ मध्ये श्री स्वामी समर्थ पादुका पूजन भक्तीभावात
बेळगाव : शहरातील शांताई वृद्धाश्रमामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका पूजन कार्यक्रम नुकताच मोठ्या भक्तीभावाने उत्साहात पार पडला. बेळगाव शहरातील आराधना संस्थेचे अध्यक्ष सुनील चौगुले यांच्या पुढाकाराने स्वामी समर्थांचे वंशज श्री श्री निलेश महाराज आणि इतर महाराजांच्या उपस्थितीत काल बुधवारी या पादुका पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शांताई वृद्धाश्रमा …
Read More »ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पाच दुचाकींना उडवले
बेळगाव : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना उडवल्याची घटना बुधवारी (दि. २४) रात्री नऊच्या सुमारास शनिवार खुटावर घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चन्नम्मा चौकातून शनिवार खुटाकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. …
Read More »डीजे मुक्त चित्ररथ मिरवणूक साजरी होणार : पोलीस विभाग – ‘मध्यवर्ती’च्या बैठकीत निर्णय
बेळगाव : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या शतकोत्तर शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसंदर्भात आज कॉलेज रोड येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक तयारी संदर्भात तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, उपाध्यक्ष …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी एन. जयराम यांची नियुक्ती
बेळगाव : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली …
Read More »संवेदनशील भागात शिवजयंती मिरवणुकीवर राहणार सीसीटीव्हीची नजर; आयुक्तालयात बैठक
बेळगाव : शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. मिरवणुकीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. संवेदनशील भागातील व मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश पोलीस निरीक्षकांन दिले आहे. तसेच पांरपारिक वाद्यांनाच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta