बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने जनमतातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची आहे, असे मत शहर समितीच्या बैठकीत खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले. शहर म. ए. समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार दिनांक 18 रोजी मराठा मंदिर सभागृहात …
Read More »राज्य कराटे स्पर्धेत आराध्या निवास सावंतला सुवर्णपदक
बेळगाव : उवा मेरिडियन काँन्वेशन सेंटरच्या सभागृह सेईकोकाई आंतरराष्ट्रीय इंडिया व कर्नाटक व फिनिक्स अकादमी इंडिया यांच्या संयुक्त विद्यामानाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेच्या आराध्या निवास सावंत हिने 1 सुवर्ण 1 रौप्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सबज्युनियर गटात कुमिटे प्रकारात सुवर्णपदक, तर कटाज प्रकारात रौप्यपदक …
Read More »शक्तीप्रदर्शनाने ग्रामीण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उद्या भरणार अर्ज
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांचा उमेदवारी अर्ज उद्या सकाळी अकरा वाजता दाखल करण्यात येणार आहे. धर्मवीर संभाजी चौकातून भव्य मिरवणुकीने कॉलेज रोडमार्गे चन्नमा सर्कल काकतीवेसहुन रिसालदार गल्लीतील तहसीलदार कार्यालयात अर्ज भरणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व आजी माजी जिल्हापंचायत, तालुका पंचायत, ग्रामपंचायत …
Read More »रमाकांत दादा कोंडुस्कर यांना मच्छे गावातून जाहीर पाठिंबा
बेळगाव : समितीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मच्छे गावामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये बेळगाव दक्षिणचे समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत दादा कोंडुस्कर यांनी भेट देऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले. मच्छे येथील नागरिकांनी त्यांचे …
Read More »ऍड. अमर येळ्ळूरकर यांना बसवन कुडची येथे एकमुखी पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तरचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना सर्वस्थरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. अमर येळ्ळूरकर यांनी आपल्या शिलेदारांसमवेत प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. समितीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या बसवन कुडची येथील नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे. …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा येळ्ळूरवासीयांचा निर्धार!
येळ्ळूर : महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. रमाकांत कोंडुसकर यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष श्री. दुद्दापा बागेवाडी होते. बैठकीच्या सुरवातीला सरचिटणीस प्रकाश अष्टेकर यांनी ही विधानसभा निवडणूक सीमाप्रश्नाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या निवडणुकीत समितीचे उमेदवार …
Read More »शक्तिप्रदर्शनाने बेळगाव ग्रामीणमधून भाजपचे नागेश मन्नोळकर यांचा अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेश मन्नोळकर यांनी आज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपमधील अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक असल्याने सर्वांचे लक्ष लागलेली बेळगाव ग्रामीणची उमेदवारी भाजपने नागेश …
Read More »बेळगाव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल; एकूण संख्या 74
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात आज दुसऱ्या दिवशी 46 अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची एकूण संख्या 74 झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवारी सुरु झाली. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी 38 उमेदवारांनी 46 अर्ज सादर केले. त्यापैकी 44 उमेदवार पुरुष असून 2 …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
बेळगाव : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण मतदारसंघातुन अधिकृत उमेदवार म्हणून श्री. आर. एम. चौगुले यांची सर्वानुमते निवड झाली असून, पुढील रणनीती ठरविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक उद्या मंगळवार दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कार्यालय सदाशिवनगर (लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागे) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व आजी-माजी …
Read More »शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे चारही मतदार संघासाठी उमेदवार निश्चित झाले असून उमेदवारांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीसाठी बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर, दक्षिणमधून रमाकांत कोंडुसकर, ग्रामीणमधून आर. एम. चौगुले आणि खानापूरमधून मुरलीधर पाटील यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता विधानसभा निवडणुकीसाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta