Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

कर्नाटक बंदला कन्नड संघटनांचा नकार!

बेळगाव (वार्ता) : राज्यभरात काही दिवसात झालेल्या अनुचित घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरून काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला इतर काही कन्नड संघटनांनीच विरोध केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सामाजिक शांतता बिघडविण्याचे कृत्य करत आहे, असा आरोप काही कन्नड संघटनांनी तसेच कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली करत …

Read More »

नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई : डीसीपी आमटे

बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे आपण सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

भिडे गुरुजींवरील वॉरंट न्यायालयाने केले रद्द

बेळगाव (वार्ता) : येळ्ळूर येथील कुस्ती आखाड्याप्रसंगी आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणीच्या खटल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर बजावण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने आज रद्दबातल केले. येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी कुस्ती आखाड्यावेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर सरकारने …

Read More »

थकीत वेतनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे आंदोलन

बेळगाव (वार्ता) : उर्वरित वेतन त्वरित द्यावे, यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्‍यांनी आंदोलन छेडले. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना सरकारी निधीतून वेतन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण 8 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे थकीत वेतन यासह 12 ते 15 महिन्यांचे थकीत वेतन अद्याप …

Read More »

2023 च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आणणे हेच ध्येय : मुख्यमंत्री बोम्माई

हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्‍या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त …

Read More »

रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील, शुभम शेळके व प्रकाश शिरोळकर यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल

मराठी द्वेषाने केलेल्या दुटप्पी कारवाईमुळे बेळगावात संतप्त प्रतिक्रिया बेळगाव (वार्ता) : बेंगलोर घटनेनंतर बेळगावात आक्रोश व्यक्त करण्यात आला. त्यात बेळगावात काही ठिकाणी अज्ञातांकडून तोडफोड झाली. मात्र, त्यात शुभम शेळके, रमाकांत कोंडुस्कर, सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मराठी भाषिक असल्याने …

Read More »

अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय : किरण जाधव

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी विमल फौंडेशनचा अभिवादन कार्यक्रम बेळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आज साजरा करण्यात आला. विमल फौंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशहितासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. जय जवान, जय किसान बरोबरच जय …

Read More »

महाराष्ट्र खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार : खास. शरद पवार

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने आज सिल्व्हर ओक येथे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सीमाभागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर आक्रोश व्यक्त करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात …

Read More »

धर्मांतर कायद्याबाबत काँग्रेस-भाजपचे नाटक : एच. डी. कुमारस्वामी

बेळगाव (वार्ता) : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यातील कन्नड भाषिकांची चिंता या सरकारला नाही तसेच आतापर्यंत केंद्र सरकारनेही राज्यातील जनतेची कोणती मदत केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय. बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रित दिली आहे. कृष्णा नदी प्रकल्पाची राष्ट्रीय योजना करण्यासाठी तत्कालीन …

Read More »

विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे. हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …

Read More »