बेळगाव : शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा मंदिरात दरवर्षी कार्तिक दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही या दीपोत्सवाने मंदिराचा परिसर प्रकाशमय करून टाकला. ११ हजार दिव्यांच्या प्रकाशात मंदिर परिसराने एक नव्या तेजाने भरून गेला होता. या निमित्ताने मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध रंगांनी भरलेल्या रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर …
Read More »भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक; 1 ठार
बेळगाव : भरधाव कार गाडीने उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात हुबळी येथील 1 ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील हलगा ब्रिज जवळ घडली. अपघातात ठार झालेल्या कार मधील दुर्दैवी व्यक्तीचे नांव गिरीश के. …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक
बेळगाव : येत्या 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजता सह्याद्री सोसायटी कॉलेज रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. या बैठकीस …
Read More »अबकारी खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
बेळगाव : बेळगांव ग्रामीण पोलिसानी सावगाव तालुका बेळगांव येथे घातली होती धाड. धाडीत 26 लिटर दारु किंमत रुपये 10,287/- व रोख 800 रु. आरोपीकडून जप्त करण्यात आले होते. बेळगांव ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या खटल्यानुसार फिर्यादी संगमेश शिवयोगी सि.पि. आय बेळगांव ग्रामीण पोलिस ठाणा यांच्या फिर्यादीवरून बेळगांव ग्रामीण पोलिस ठाण्याचे …
Read More »फेस्त ऑफ किंगच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधवांची मिरवणूक
बेळगाव : फेस्त ऑफ किंग सणाच्या निमित्ताने शहरातील ख्रिश्चन समुदायातर्फे धार्मिक मिरवणूक रविवारी सायंकाळी पार पडली. बेळगाव विभागाचे बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिरवणूक पार पडली. कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च येथून दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. सदर मिरवणूक सेंट जोसेफ कॉन्व्हेंट रोड, ग्लोब थिएटर, …
Read More »सुट्टीवर आलेल्या जवानाची तलावात उडी घेऊन आत्महत्या..
बेळगाव : भारतीय सैन्य दलात सेवा बजावण्याऱ्या आणि सुट्टीवर आपल्या गावी आलेल्या जवानाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावात उघडकीस आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील परसनट्टी गावचे रहिवासी नरेश यल्लप्पा आगसार (२८) हे सुट्टीवर आपल्या गावी आले होते. कौटुंबिक …
Read More »बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा मृत्यू
बेळगाव : बेळगावातील कित्तूर राणी चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयातील वाघिणीचा आज सकाळी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे मृत्यू झाला आहे. मायकोप्लाझ्मा, सायटॉक्सझोनोसिस आणि बेबेसिओसिस नावाच्या दुर्मिळ आजाराने वाघीण ग्रस्त होती . गेल्या २१ दिवसांपासून वन्यजीव डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शौर्यवर प्राणिसंग्रहालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी ९.४० वाजता अकार्यक्षम उपचारांमुळे तिचा मृत्यू झाला, …
Read More »कागवाड येथे भीषण रस्ता अपघातात दाम्पत्याचा मृत्यू
कागवाड : तालुक्यातील मंगळसुळी ऐनापूर रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील कराविर तालुक्यातील कोटेरा गावातील आदर्श युवराज पांडव (वय 27) आणि शिवानी आदर्श पांडव (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये ११११ दिव्यांची आरास करून साजरा केला दीपोत्सव
बेळगाव : आदर्शनगर येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये आज दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आज फौंडेशन परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती तसेच आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. सायंकाळी सहा वाजता श्री परमज्योति अम्माभगवानांच्या पादुकांचा पुष्पाभिषेक करून महाआरती करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी मंदिर परिसर …
Read More »भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयातील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव भट यांचे निधन
बेळगाव : भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मधून सेवानिवृत्त झालेले एक ज्येष्ठ अधिकारी श्री. वासुदेव भट यांचे अलीकडेच बेळगाव मुक्कामी दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 80 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी डॉक्टर शारदा आचार्य, एक चिरंजीव व एक कन्या असा परिवार आहे. बेळगाव येथील किल्ल्यामध्ये पूर्वी असलेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta