Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

प्रचार परवानगीसाठी लागणार अत्यावश्यक कागदपत्रे

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणारे प्रचार, जाहीर सभा, ध्वनिक्षेपकांचा वापर, प्रचार कार्यालयांचा प्रारंभ आदींच्या परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असून सदर परवानगीसाठी इच्छुक उमेदवाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला 48 तास आधी हा अर्ज करावा लागेल. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देखील निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक विभागाकडून जाहीर …

Read More »

हिरेबागेवाडी टोलनाक्यावर भल्या पहाटे 2 कोटी जप्त

  बेळगाव : हिरेबागेवाडी टोलनाक्यावर योग्य कागदपत्रांविना खासगी बसमधून वाहतूक करणारी दोन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबईहून बंगळुरूकडे निघालेल्या खासगी बसची तपासणी केली असता, एफएसटी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाला सदर अवैध पैसे आढळून आले. केपी एक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली …

Read More »

बेळगाव ग्रामीणचे युवराज… श्रीयुत राजू एम. चौगुले!

  “लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!” असा एक वाक्प्रचार प्रचलित आहे याचाच अर्थ असा की लहान मुलं ज्या ज्या गोष्टी बालपणात करीत राहतात त्यातच त्यांचं भावी कर्तृत्व दडलेलं असतं. बेळगाव तालुक्यातील मण्णूर हे गाव, याच गावातली ही अशीच एक कहाणी आहे. ती काहणी ४९ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक ०५ एप्रिल १९७४ …

Read More »

रमाकांत कोंडुसकरांना युवा कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीने रमाकांत कोंडुसकर यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या काही बैठकीमध्ये उमेदवार निवड प्रक्रिया जाहीर केली असून अधिकाधिक जनमत असलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्याची घोषणा केली होती. रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे …

Read More »

विधानसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवार यांनी घेतला आढावा

  मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांबरोबरच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हालचालींवर आपली बारीक नजर आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आपल्या संपर्कात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याचा मला विश्वास आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात समितीचा एकच उमेदवार जाहीर केल्यास, विजय निश्चित आहे, …

Read More »

श्री. वाय. एन. मजुकर “आदर्श शैक्षणिक सेवा गौरव” पुरस्काराने सन्मानीत

  बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्यावतीने आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात. त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांतून …

Read More »

सीमाभागातील 865 गावांना मिळणार जन आरोग्य योजनेचा लाभ

  मुंबई : कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावातील मराठी भाषिकांना शिंदे – फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबातील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे. कर्नाटक व्याप्त सीमा भागातील …

Read More »

उमेदवार निवडीसाठी उत्तर विभाग कोअर कमिटीची घोषणा

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवार निवडीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती निवड समितीची रचना करण्यात आली असून या समितीत 21 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवार निवड प्रक्रियेच्या निवडीसाठी प्रारंभी चार सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आता 21 जणांचा समावेश करण्यात आला आहे. या निवड …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेकडे 126 कोटीच्या ठेवी जमा

  बेळगाव : येथील दि बेळगाव पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतो गेल्या आर्थिक वर्षात ठेवी व कर्ज वाटपात वाढ झाली असून 31 मार्च अखेर बँकेने 127.48 कोटीच्या ठेवी जमा केल्या आहेत. बँकेला पहिल्यांदाच एक कोटी 55 लाख रुपयाचा नफा झाला आहे .”अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली …

Read More »

उचगांवच्या शेतकऱ्यांनी रिंगरोडच्या विरोधात सुनावणीत नोंदविले आक्षेप

  कोणत्याही परिस्थितीत सुपिक जमिन देणार नाही बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील सुमारे 1272 एकर सुपिक जमीन बेळगावच्या सभोवताली रिंगरोड करण्यासाठी भूपसंपादन करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डाव आखला आहे. सदर भूसंपादनाच्या विरोधात सुमारे 865 शेतकऱ्यांनी आपले लेखी आक्षेप नोंदविले आहेत. आज रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्फत उचगांव येथील शेतकऱ्यांना सुनावणीसाठी …

Read More »