Sunday , March 8 2026
Breaking News

बेळगाव

भोई गल्लीत दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना

बेळगाव : शहरातील भोई गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाची स्थापना कार्यक्रम आमदार, गल्लीतील पंच आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार बेनके यांनी आपल्या भाषणात, एकीचे बळ मोठे असून महिलांनी एकजुटीने कार्य करीत राहावे. मंडळातील …

Read More »

चव्हाट गल्ली येथील बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : बेळगाव शहरातील अनिल बेनके फाउंडेशन आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बृहत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज चव्हाट गल्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जागतिक डॉक्टर्स डे …

Read More »

राजस्थानमधील उदयपूर येथील हत्येच्या निषेधार्थ हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने निवेदन

बेळगाव : भारतात हिंदूंची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे झालेल्या कन्हैया लाल यांच्या हत्येचे प्रकरणाच्या आधी सुद्धा हिंदूं व्यक्तीवर या ना त्या कारणावरून सूड उगवत मुस्लिम धर्मियांनी अनेकांच्या हत्या केली आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीने त्या अपराधांना कडक शिक्षा व्हावी आणि हिंदूंना संरक्षण मिळावे …

Read More »

कालिदास दिनानिमित्त उद्या ‘कबीरनीती’ विषयावर व्याख्यान

शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजन बेळगाव : आषाढस्य प्रथम दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ‘मेघदूत’ सारखे महाकाव्य लिहून कालिदासानी आपली प्रचंड काव्य प्रतिभा सिद्ध केली आहे. शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदासानिमित्त उद्या शनिवार दि. २ जुलै …

Read More »

रोहन कोकणे याचा चिक्कबळापूर येथे सन्मान

बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचा स्केटिंगपटू आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त रोहन कोकणे याचा चिक्कबळापूर येथे सन्मान करण्यात आला. स्केटिंग क्षेत्रातील त्याच्या असामान्य कार्याबद्दल त्याचा हा गौरव करण्यात आला आहे. 27 जून 2022 रोजी चिक्कबळापूर येथे एसजेसीआयटी येथे व्हीटियू आचिवर्स डे कार्यक्रमात रोहन कोकणे याला सन्मानित करण्यात आले. 10000 …

Read More »

महापौर, उपमहापौर निवड त्वरित करावी : आप पक्षाच्या वतीने निवेदन सादर

बेळगाव : बेळगांव महापौर, उपमहापौर निवड लवकरात लवकर करून नगरसेवकांना त्यांच्या पदाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगांव शाखेने एक निवेदनाद्वारे शिरस्तेदार पारगी यांच्याकडे केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी 30 जून रोजी निवेदन देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊन 9 नाहीने झाले तरी …

Read More »

चंदगड सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना आवाहन

बेळगाव : येथील चंदगड तालुका रहिवासी संघटना व चंदगड मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे सभासदांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण व दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शैक्षणिक साहित्यासाठी पहिली ते सातवीच्या विध्यार्थीनी आपली नावे रामदेव गल्ली येथील सोसायटीच्या कार्यालयात नोंदवावी. तसेच 75%हुन अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेचे झेरॉक्स कार्यालयात आणून द्यावे. …

Read More »

रविवारी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण

बेळगाव : शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ वाढली आहे. त्यामुळे या साथीच्या आजारापासून नागरिकांचा बचाव व्हावा याकरिता श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 3 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून येथील आनंदनगर वडगाव मधील शिवमंदिर येथे श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्यावतीने रमाकांत …

Read More »

पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय : सिटीझन्स कौन्सिलची निवेदनाद्वारे मागणी

बेळगाव : आषाढी एकादशीसाठी बेळगाव जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूरला जातात. त्यासाठी बंद असलेली पंढरपूरची दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबरोबरच 8 ते 13 जुलै दरम्यान अतिरिक्त रेल्वेची सोय करावी, अशी मागणी बेळगाव सिटीझन्स कौन्सिलने नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. …

Read More »

पात्रतेच्या आधारावरच पौरकार्मिकांना सेवेत करणार कायम : जिल्हाधिकारी नितेश पाटील

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेत पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्याची प्रक्रिया सुरुच आहे. मात्र पात्रतेच्या आधारावर त्यांना सेवेत कायम करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आणि पालिका प्रशासक नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगावात पौरकार्मिकांनी आजपासून सुरु केलेल्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, पौरकार्मिकांना सेवेत कायम करण्यासाठी केवळ बेळगावातच नव्हे तर राज्यभरात …

Read More »