शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालयाच्या वतीने आयोजन
बेळगाव : आषाढस्य प्रथम दिवस हा महाकवी कालिदास दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. ‘मेघदूत’ सारखे महाकाव्य लिहून कालिदासानी आपली प्रचंड काव्य प्रतिभा सिद्ध केली आहे. शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदासानिमित्त उद्या शनिवार दि. २ जुलै रोजी संध्या ५.३० वा शहापूर येथील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा स्वरूपा इनामदार यांचे ‘कबीरनीती’ या विषयावर व्याख्यान होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अशोक आलगोंडी उपस्थित राहणार आहेत.
सदर व्याख्यानाला मराठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दगंध कवी मंडळचे सचिव श्री. सुधाकर गावडे यांनी केले आहे.