बेळगाव : बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचा स्केटिंगपटू आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त रोहन कोकणे याचा चिक्कबळापूर येथे सन्मान करण्यात आला. स्केटिंग क्षेत्रातील त्याच्या असामान्य कार्याबद्दल त्याचा हा गौरव करण्यात आला आहे. 27 जून 2022 रोजी चिक्कबळापूर येथे एसजेसीआयटी येथे व्हीटियू आचिवर्स डे कार्यक्रमात रोहन कोकणे याला सन्मानित करण्यात आले.
10000 रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन डॉ. ए. जे. बुजूरके, डॉ. राजेश डॉ. कसीदाप्पा, व्हा. चांसलर, डॉ.मोहन, डॉ. पी. व्ही. कडगडकाई यांच्या हस्ते रोहनला सन्मानित करण्यात आले.