Monday , September 21 2026
Breaking News

महापौर, उपमहापौर निवड त्वरित करावी : आप पक्षाच्या वतीने निवेदन सादर

Spread the love

बेळगाव : बेळगांव महापौर, उपमहापौर निवड लवकरात लवकर करून नगरसेवकांना त्यांच्या पदाचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगांव शाखेने एक निवेदनाद्वारे शिरस्तेदार पारगी यांच्याकडे केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी 30 जून रोजी निवेदन देऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊन 9 नाहीने झाले तरी अद्याप बेळगांव शहराला महापौर, उपमहापौर मिळाले नाहीत. नगरसेवकांना देखील त्यांचे अधिकार मिळालेले नाहीत. अद्याप सभागृह अस्तित्वात नाही त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्यात हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच अशोकनगर येथे 2.14 एकर जागेत 16.5 कोटी रुपये खर्च करून भव्य क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. क्रीडासंकुलाचे उद्घाटन ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या ₹ करण्यात आले आहे मात्र अद्याप हीहे क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात आले नाही. त्यामुळे क्रीडापटूची गैरसोय होत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अनिस सौदागर, इम्रान सय्यद, सुदर्शन शिंदे, यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *