बेळगाव : 15 मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या एकत्रिकरणाच्या कार्यक्रमासाठी व बेंगळोरस्थित मराठा समाजाच्या मठाचे मठाधीश म्हणून अधिग्रहण केल्याबद्दल मंजुनाथ स्वामींचा सत्कार करण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले, मराठा समाजाचे महत्वाचे अधिष्ठान बेंगळोर येथे आहे. हे सर्व समाजाला …
Read More »ग्रामीण आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांना सत्तेचा माज : धनंजय जाधव
बेळगाव : गणेशपुर-सरस्वती नगर येथील श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांचे कोणत्याही शासकीय अथवा न्यायालयीन आदेशाविना बुल्डोझरने घर पाडण्यात आले, तसे पाहता त्या घराबाबत उच्च न्यायालयाने श्री. रविंद्र कृष्णाजी मोहिते यांच्या बाजुने निर्णय दिला आहे. तरी सुद्धा 60 फुट रस्ता निर्मितीसाठी घर पाडण्यात आले असे सांगण्यात आले. रस्ता व्हावा अशी आमची …
Read More »भवानीनगर येथे बांधकाम व्यावसायिकाची हत्या
बेळगाव (प्रतिनिधी) : शहरातील भवानीनगर उपनगराच्या जवळ एका व्यावसायिकाची हत्या झाल्याचा प्रकार मंगळवारी भल्या पहाटे घडला आहे. चाकूने वार करून त्याला ठार करण्यात आले आहे. त्याआधी त्याच्या डोळ्यात आणि तोंडामध्ये तिखट पूड टाकून त्याला भोसकण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे टिळकवाडी, भवानीनगर, मंडोळी रोड परिसरात एकच खळबळ माजली …
Read More »तारांगण आयोजित निबंध स्पर्धेत प्रीती पठाणी प्रथम, अनिरुद्ध सुतार द्वितीय, संजना पाटील तृतीय
बेळगाव : बेळगावमध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवणारे महिलांचे हक्काचे व्यासपीठ तारांगणने जागतिक मराठी भाषा दिन औचित्य साधून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. आई एक दैवत, राष्ट्रीय एकात्मता, माझा आवडता समाज सुधारक, मराठी असे आमची मायबोली या निबंधाच्या विषयावर दहावीच्या …
Read More »शॉर्टसर्किट झाल्याने दुकानाला आग
बेळगाव : शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून केक बनविण्याच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानातील एकूण जवळपास 70 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी रात्री ताशिलदार गल्ली येथे घडली. कपिलेश्वर रोड ताशिलदार गल्ली येथील ‘स्प्रिंकल्स केक मटेरियल्स’ बिल्डींग मालक इराप्पा महादेव जुवेकर व दुकानं। मालक दत्ता लोहार यांच्या मालकीच्या दुकानाला काल …
Read More »दोषारोप पत्र दाखल करावे; आपचे एसीबी प्रमुखांना निवेदन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील 9 वर्षापासूनच्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) दोषारोप पत्र दाखल केले जावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे (आप) करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज सोमवारी सकाळी एसीबी जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर करण्यात आले. बेळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या 9 वर्षात मालमत्ता हडपण्याचा …
Read More »बी. के. मॉडेलला राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळा पुरस्कार
बेळगाव : कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयातर्फे शहरातील कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूलला 2021 सालातील कनिष्ठ विभागातील राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. बेंगलोर येथे काल रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयाचे प्रमुख एअर कमोडोर भूपेंद्रसिंग कंवर यांच्या हस्ते बेळगावच्या बी. के. मॉडेल हायस्कूलला प्रशस्तीपत्रासह …
Read More »दिव्यांग टे. टे. खेळाडूंचे राज्य स्पर्धेत सुयश
बेळगाव : कर्नाटक राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि कर्नाटक राज्य दिव्यांगांसाठीचे टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स फाऊंडेशन बेळगावच्या दिव्यांग टेबल टेनिसपटू स्पृहणीय यश संपादन केले. 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स …
Read More »म. ए. समिती दक्षिण विभागाच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती व महिला दिन साजरा
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती दक्षिण विभागाच्या वतीने आज 10/3/2022 रोजी वडगाव भागात सावित्री बाई फुले जयंती व महिला दिन साजरा करण्यात आला. दक्षिण भागाच्या अध्यक्षा सौ. सुधा भातकांडे, उपाध्यक्ष गीता हलगेकर, सरचिटणीस वर्षा आजरेकर यांनी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या म्हणून महिला आघाडीच्या प्रमुख सौ. रेणू किल्लेकर …
Read More »‘मजदूर नवनिर्माण संघाच्या’ वतीने महिला दिनाचा जागर
बेळगाव : ‘मजदूर नवनिर्माण संघातर्फे’ बेळगांव तालुक्यातील महिलांचा जागर आंबेवाडी ग्रामपंचायतीत येणाऱ्या मण्णूर गावामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात (काजूच्या बागेत), महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय व सुत्रसंचलन यशोदा गोविंदाचे यांनी सांभाळलं त्यांना सुधिर काकतकर यांनी सहाय्य केले. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विप प्रज्वलन करण्यात आले, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta