बेंगळुरू : सदाशिवनगर बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लाल-पिवळ्याची होळी केल्याने भगव्याचा अवमान …
Read More »चार बंधू आमदार, त्या वृत्ताची राष्ट्रीय स्तरावरील माध्यमांनी घेतली विशेष दखल
बेळगाव : विधान परिषदेच्या निवडणूक निकालांकडे साऱ्यांचे लक्ष लागलं होतं. यात प्रामुख्याने कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना बेळगाव जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत. येथील निवडणुकीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता होती. यात निवडणुकीच्या निकालातून जारकीहोळी बंधूचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जारकीहोळी कुटुंबातील ३ जण सध्या आमदार आहेत. …
Read More »यल्लम्मा डोंगराच्या चार चेकपोस्टवर भाविकांची तपासणी, आरोग्य आणि पोलिस खाते सतर्क
बेळगाव : महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्ण वाढू लागल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. त्याचबरोबर काल गुरुवारी बेळगावात ओमिक्रोन रुग्ण आढळला आहे. कोरोना संक्रमण आणि ओमिक्रोन धास्तीने 19 डिसेंबरला होणाऱ्या सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची पोर्णिमा यात्रेसह बेळगाव जिल्ह्यातील सर्व यात्रा, उत्सव, महोत्सव, धार्मिक विधी, आदीं कार्यक्रमांवर शासनाने निर्बंध लादले आहेत. शनिवार दिनांक …
Read More »आनंदवाडी येथील जागेसंदर्भात धर्मादाय मंत्र्यांशी चर्चा
बेळगाव (वार्ता) : आनंदवाडी येथील घरे ताब्यात घेण्यासाठी वक्फ बोर्डाने प्रयत्न केले होते. मात्र याविरोधात न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यात आली आहे. मात्र अशा प्रकारचा प्रयत्न यापुढे होऊ नये आणि येथील रहिवाशांना बेघर व्हावे लागू नये. यासाठी आता हा मुद्दा विधानसभेत मांडण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले …
Read More »1971 युद्धाने देशाला बळकट करण्यासाठी नवी प्रेरणा दिली : मुख्यमंत्री बोम्माई
शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली; शौर्य विजेत्यांच्या अनुदानात वाढ बेळगाव (वार्ता) : 1971 साले झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. त्याला 50 वर्षे पूर्ण होत असताना, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगावातील मराठी लाइट इन्फंट्री सेंटरच्या प्रांगणात गुरुवारी (दि. 16) आयोजित ’विजय दिवस’ …
Read More »कर्नाटकात लवकरच मराठा समाज विकास महामंडळ पदाधिकार्यांची निवड
मंत्री आर. अशोक यांची माहिती बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात मराठा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी कर्नाटक सरकारने मराठा समाज विकास महामंडळ घोषणा केली आहे. दरम्यान अद्यापही या महामंडळावर अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड झालेली नाही. यासंदर्भात आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आज गुरुवारी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी …
Read More »उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य नको ; कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश
बंगळूर : उच्च शिक्षणात कन्नड भाषा अनिवार्य करण्याचा आग्रह धरू नये, असे स्पष्ट निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 16) राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी आणि न्यायमूर्ती सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020च्या कथित अंमलबजावणीच्या आधारे पदवी अभ्यासक्रमांमध्ये कन्नड भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य …
Read More »भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत
बेळगाव : बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुर्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. तथापि बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे ठोस आश्वासन केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास …
Read More »वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी बेळगाव (वार्ता) : वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार असून येत्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौर्यावर येणार आहोत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती युवकांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी बेळगाव खानापूर …
Read More »संसदेत निश्चित आवाज उठवू : खा. श्रीकांत शिंदे
बेळगाव : सध्या नवी दिल्लीत असलेल्या बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळांने आज गुरुवारी सकाळी मुंबई महाराष्ट्रातील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल लोकसभेत आवाज ठेवण्याची विनंती केली. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील संसदेत निश्चितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta