Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

संभाव्य कोविड तिसर्‍या लाटेचा सामना करण्यास सरकार सज्ज

आरोग्यमंत्री के. सुधाकर बेंगळुरू : कर्नाटकाचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले की, कर्नाटक सरकार संभाव्य कोविड -19 च्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पत्रकारांशी बोलताना सुधाकर म्हणाले, सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. पण, कोविडचा प्रसार हाताळण्यासाठी आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज आहे. उपचार देणे हा एक भाग आहे …

Read More »

‘त्या’ दुर्देवी बालिकेचा अखेर मृत्यू

बेळगाव : दोन वर्षीय बालिकेचा ऊसाच्या शेतात जाळून खून केल्याचा गंभीर प्रकार अथणी तालुक्यात उघडकीस आला आहे. त्या चिमुरड्या बालिकेला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला असून खळबळ माजवणारी ही घटना आहे. आज सकाळी अथणी जवळील एका शेतात त्या मुलीचा अर्धवट …

Read More »

राज्यस्तरीय हॉकी शिबिरासाठी अभिनंदनीय निवड

बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेच्या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या हॉकीपटुंची वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी बेंगलोर येथे होणार्‍या राज्यस्तरीय शिबिराकरिता निवड झाली आहे. टिळकवाडी येथील गोगटे कॉलेजच्या विद्यार्थिनी असणार्‍या श्रेया भातकांडे आणि प्राजक्ता निलजकर या उत्तम हॉकीपटू आहेत. यापूर्वी अनेक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदविणार्‍या या दोन्ही …

Read More »

येळ्ळूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम

येळ्ळूर : येळ्ळूर (ता. बेळगाव) गावामध्ये सध्या एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला आहे. नऊ जणांचा जावा घेणार्‍या या धोकादायक कुत्र्याला पकडण्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. सदर पिसाळलेल्या कुत्र्यामुळे येळ्ळूर गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. हे कुत्रे अचानक प्रकट होऊन अंगावर धावून जात असल्यामुळे नागरिकांना जीव …

Read More »

येळ्ळूर रस्त्यावर दोन बसची चढाओढ; कारवाईची मागणी

येळ्ळूर : येळ्ळूर रस्त्यावर एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोन बसची चढाओढ होत असल्याचे आज निदर्शनास आले. बेभान बस चालवल्याबद्दल जाब विचारणार्‍या नागरिकांना परिवहन मंडळाच्या बस चालकांनी उद्दाम उत्तरे देत बससेवा बंद करण्याची धमकी दिल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे. आज येळ्ळूर रोडवर वायव्य कर्नाटक …

Read More »

येळ्ळूर येथे भग्न गणेश मूर्तींचे लोकसेवा फौंडेशनच्यावतीने विसर्जन

येळ्ळूर : येळ्ळूर येथे भग्न झालेल्या गणेश मूर्तींचे सर्व लोकसेवा फौंडेशनच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले. ज्या गणेश मूर्तींना तडा गेला असेल किंवा रेखीव नसतील अथवा भग्न झालेल्या मूर्ती भाविक खरेदी करत नाहीत, मूर्तिकार अथवा विक्रेते देखील त्या मूर्ती तशाच ठेवतात. अपवादात्मक परिस्थितीत काही विक्रेते अथवा मूर्तीकार अशा मूर्तींचे विसर्जन …

Read More »

चन्नराज हट्टीहोळी यांची भाजपवर बोचरी टीका

बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात उपहासात्मक विधान करणार्‍या माजी आ. संजय पाटील यांच्या विरोधात हेब्बाळकर यांचे बंधू काँग्रेस नेते चन्नराज हट्टीहोळी यांनी बोचरी टीका केली आहे. ‘भाजप नेते हे अंधारात येऊन चोरी करणारे चोर आहेत‘ अशी टीका केली आहे. राजकीय वादातून बुधवारी रात्री माजी आ. संजय पाटील …

Read More »

म. ए. समितीची 3 ऑक्टोबर रोजी बैठक

बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि माजी आमदार …

Read More »

मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात : प्रमोद मुतालिक

बेळगाव : मशिदीतील नमाजमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी गंभीर आरोप केले आहेत की हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण थांबवण्याचे आदेश देऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. रात्री …

Read More »

दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …

Read More »