Monday , September 21 2026
Breaking News

शॉर्टसर्किट झाल्याने दुकानाला आग

Spread the love


बेळगाव : शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून केक बनविण्याच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानातील एकूण जवळपास 70 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी रात्री ताशिलदार गल्ली येथे घडली.

कपिलेश्वर रोड ताशिलदार गल्ली येथील ‘स्प्रिंकल्स केक मटेरियल्स’ बिल्डींग मालक इराप्पा महादेव जुवेकर व दुकानं। मालक दत्ता लोहार यांच्या मालकीच्या दुकानाला काल रविवारी रात्री 10:15 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. दुकानाला लागलेल्या आगीमध्ये केक तसेच केक बनविण्याचे साहित्य असा सुमारे 55 हजार रुपयांचा माल पूर्णपणे जळून गेला.

त्याचप्रमाणे होळी सणानिमित्त दुकानांमध्ये जवळपास 17 हजार रुपयांचे होळीचे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. हे साहित्य देखील आगीमध्ये जळून खाक झाले आहे. सदर दुर्घटनेमुळे इराप्पा महादेव जुवेकर यांचे मोठे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *