बेळगाव : जुने बेळगाव जवळील बी. एस. येडियुराप्पा मार्गावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला गेला आहे. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वैद्यकीय कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.विखरून पडलेल्या या कचऱ्यामध्ये कुलंट जेल बॅग, इंजेक्शन, औषधाची पाकिटे, …
Read More »शेतकरी रस्ते योजना कागदावरच; शेतकऱ्यांसाठी रस्ते दुरुस्त करण्यात अनास्था
बेळगाव : सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेची बैठक समर्थ नगर येथील पाटील राईस मिल येथे संपन्न झाली. यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील उगवलेले रान व चिखल काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे असे सर्वानुमते सुचविण्यात आले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण …
Read More »मनपासमोर नवा लाल-पिवळा लावण्याचा कन्नडीगांचा प्रयत्न
बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड ध्वजस्तंभ 28 डिसेंबर 2020 रोजी स्थापित करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ऊन, वारा आणि पावसामुळे फाटलेला ध्वज बदलण्याची मागणी होत आहे. जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेचे कार्यकर्ते करत असताना पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. बेळगाव महानगर पालिकासमोर काही महिन्यांपूर्वी स्थापित …
Read More »राष्ट्रीय पक्षांकडून खानापूर-रामनगर रस्त्याचे श्रेय लाटल्याचा प्रयत्न
खानापूर म. ए. युवा समितीचा आरोप खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर रस्त्याचे काम रखडल्याने मे महिन्यातच या रस्त्याचे फोटो व छायाचित्रण करून खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांना या रस्त्यासंदर्भात निवेदन सादर केले. व त्याचे लक्ष वेधुन घेतले. लागलीच तालुक्यातील राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी याचे त्रेय …
Read More »कपिलेश्वर मंदिर भाविकांसाठी झाले खुले!
बेळगाव : कोरोना संकट आटोक्यात आल्याने राज्य सरकारने अनलॉक ३.० जारी करत अनेक निर्बंध उठवले आहे. त्यानुसार बेळगावातील ‘दक्षिण काशी‘ म्हणून ओळखले जाणारे कपिलेश्वर मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुले केले आहे. दुकाने, व्यापारी आस्थापनांना रात्री ९ वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देतानाच सरकारने भाविकांना दर्शनासाठी मंदिरेही खुली केली आहेत. त्यानुसार कोविड मार्गसूचीचे पालन …
Read More »बाबा धबधबा ठरला पर्यटकांच्या पसंतीला…
बेजबाबदार पर्यटकांकडून होतीये नासधूस चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील शेवटचे टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारगडपासून अगदी ठराविक अंतरावर असणाऱ्या बाबा धबधब्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. या ठिकाणी कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यांतील पर्यटकांची ये-जा होत असून दिवसेंदिवस बाबा धबधब्याला गर्दी होताना दिसत आहे. निसर्गाचे नाविन्यपूर्ण सौदर्य व …
Read More »जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर डे साजरा
बेळगाव : जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे डॉक्टर्स डे निमित्त शहरातील डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर सविता कद्दु होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.प्रथम कोरोनामुळे प्राण गमावलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ईशस्तवन डॉक्टर मरियम तेबला यांनी सादर केले.फाऊंडेशनच्या अध्यक्षा माधुरी जाधव- पाटील …
Read More »लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने कोविड-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न
बेळगाव : बेळगावातील कोरोना विषाणूचा गणेशोत्सवात सामना करण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. जास्तीत जास्त मूर्तिकारानी लसीकरण करावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ यांच्यातर्फे शनिवारी सकाळी 10 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौक येथील समादेवी मंगल कार्यालयात गणेश मूर्तिकार व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबिय सदस्यांसाठी कोविड-19 लसीकरण …
Read More »पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी
शहापूर विभाग मध्यवर्ती श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बैठक संपन्न बेळगाव : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली. शहापूर येथील बॅ. नाथ पै चौकातील श्रीसाई गणेश सोसायटीच्या सभागृहात ही बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी महामंडळाचे …
Read More »साहित्य संमेलनातून सामाजिक समता, बधुता व न्याय मिळावा – रामदास आठवले
साहित्य संमेलन हे उपेक्षितांना जगण्याचं बळ देतं– संमेलनाध्यक्ष अमोल बागुल शरद गोरे यांचे कार्य प्रेरणादायी असून साहित्य क्षेत्रातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून आमदार पद मिळालं पाहिजे– महादेव जानकर सीमाभागात मराठीची गळचेपी थांबवावी – सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. पुणे (रवी पाटील) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 3 रे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta