मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक संपन्न कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा. तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी “ॲक्शन प्लॅन” तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी …
Read More »हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टींविरोधात सुजित मिणचेकर, चेतन नरके या दोन नावांची चर्चा
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे जर महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर हातकणंगले लोकसभेची जागा ठाकरे गट लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाकडून हातकंणगले जागेसाठी चेतन नरके आणि माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. चेतन नरके हे गोकुळ संघांचे संचालक आहेत …
Read More »राजकीय जाहिरात प्रमाणिकरण, पेड न्यूज आणि फेक न्यूजबाबत माध्यम कक्षाची स्थापना
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून माध्यम कक्षाची पाहणी कोल्हापूर (जिमाका): लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ 47 व 48 करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या. या कक्षामध्ये …
Read More »पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वाठारजवळ अपघात; चार ठार
पेठवडगाव/नवे पारगाव/कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर वठार तर्फ वडगाव येथे सेवा रस्त्यावर काँक्रीट मशीन लावताना भरधाव ट्रकने टेम्पोला पाठीमागून धडक दिली. रविवारी (दि. १७) रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार सेंट्रिंग कामगार ठार झाले, तर दोन महिलांसह आठजण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू …
Read More »कोल्हापूरातून शाहू महाराजांविरोधात थेट समरजितसिंह घाटगे रिंगणात?
कोल्हापूर : राज्यामध्ये अवघ्या चर्चेचा विषय झालेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित केल्यानंतर आता भाजपने शांतीत क्रांती करत आपला पत्ता उघडला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय मंडलिक यांचा शाहू महाराजांसमोर निभाव लागणार नाही, याची चर्चा रंगली असताना आता …
Read More »लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील तपासणी चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा समन्वय बैठकीत निर्णय
कोल्हापूर (जिमाका) : येत्या दोन महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी व बेळगाव प्रशासनाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमा चौक्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय समन्वयक बैठकीत घेतला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेसीडन्सी क्लब कोल्हापूर येथे याबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील …
Read More »शाहू महाराजांच्या उमेदवारीवरुन संभ्रम; कोल्हापूरची जागा आमचीच : संजय राऊत
कोल्हापूर : एकीकडे राज्यातील जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असली तरी कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन मविआत संभ्रम असल्याचं चित्र दिसून येतंय. कोल्हापूरची जागा ही शाहू महाराज छत्रपतींनी लढवावी असं तिन्ही पक्षांनी ठरवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. तर दुसरीकडे शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे खासदार …
Read More »गीतकार रवींद्र पाटील यांचा कोजिमतर्फे सत्कार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापूर विद्यापीठ येथील वि. स. खांडेकर भाषा भवन येथे कोजिम कोल्हापूरतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष, बेळगाव मराठी साहित्य संमेलन संयोजक व नुकताच प्रदर्शित झालेले सीमाभागातील गौरवगीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा’ या गीताचे गीतकार म्हणून सीमाकवी रवींद्र पाटील यांचा साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते लेखक डॉ. …
Read More »कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा डिजिटल मिडीयाचा स्नेह मेळावा व कार्यकारिणी निवडीसंदर्भात कोल्हापूर सहकार बोर्ड येथील सभागृहात मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, डिजिटल मिडीया राज्य उपाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे व निमंत्रक अनिल धुपदाळे, विठ्ठल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी …
Read More »सांगलीतील भीषण अपघातात कोल्हापूरचे ३ जण ठार
सांगली : रत्नागिरी -नागपूर महामार्गावरील शिरढोण (ता. कवठेमंकाळ) येथील उड्डाण पुलावरील दुभाजकाला कार धडकून भीषण अपघातात झाला. या अपघातात २ पुरुष व १ महिला जागीच ठार झाली. तर एक जण जखमी झाला. ही घटना आज (दि.१९) घडली. अपघातातील मृत कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. सूर्यकांत दगडू जाधव, गौरी …
Read More »