Sunday , August 30 2026
Breaking News

बेनाडी रेणुका देवीच्या आंबील यात्रेनिमित्त दर्शनासाठी दिवसभर भाविकांची गर्दी

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळील रेणुका मंदिरात रेणुका विश्वस्त कमिटीतर्फे शुक्रवारी (ता.१३) आंबील चा कार्यक्रम पार पडला आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे मंदिरातील पुजारी राम जोशी यांच्या हस्ते रेणुका देवीच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. सकाळी पूजा, दुपारी १२ वाजता भाविकातर्फे कापूर लावण्यात आला. रेणुका देवी विश्वस्त कमिटीतर्फे आयोजित महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. रात्री राशिवडे येथील रेणुका देवीच्या गाण्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी विश्वस्त कमिटीचे सातगोंडा जनवाडे, बाळासाहेब देशिंगे, राजेंद्र फतरे सुनील शहा, रायगोंडा पाटील, विजय देशिंगे, आमित देशिंगे, आप्पासाहेब पाटील (षटगोंडा) अण्णासाहेब घाटवडे, शिवाजी परीट, आप्पासाहेब ढवणे, विक्रांत गोरे, विशाल फतरे, गौराबाई परीट, लक्ष्मीबाई कांबळे, शांताबाई परीट, सुगंधा मधाळे, केरूबाई कांबळे, पारूबाई बन्ने, सिंधुबाई गोरे यांच्यासह भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love    निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *