Sunday , August 30 2026
Breaking News

बोरगावात विकासकामासाठी आमदार जोल्लेंच्या प्रयत्नाने २.५० कोटींचा निधी : नगरसेवक शरदराव जंगटे यांची माहिती

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : माजी खासदार व डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या सहकार्याने माजी मंत्री व निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव शहराच्या विकासासाठी पुन्हा अडीच कोटीचा निधी मंजुर झाल्याची माहिती श्री हालशुगर साखर कारखान्याचे संचालक व बोरगाव येथील नगरसेवक शरदराव जंगटे यांनी दिली.
बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
जंगटे म्हणाले, संत रोहिदास मंदिराचा जीर्णोध्दार व्हावा, या मागणीसाठी आमदार शशिकला जोल्ले यांच्याकडे निवेदन दिले देण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेऊन रोहिदास मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मंदिराचे बांधकाम व मंदिर आवारातील अद्यावत सुविधा राबविण्यात येणार आहेत. याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक ५ प्रभाग ६ प्रभाग ८ प्रभाग ९, प्रभाग १०, प्रभाग १५, प्रभाग १६, प्रभाग १७ मधील नगर पंचायतीच्या एकूण जवळपास आठ वॉर्ड मधील प्रत्येक विभागात रस्ता व गटारीच्या निर्मितीसाठी जवळपास २ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचेही नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले.
निपाणी मतदारसंघातील बोरगाव हे लोक संख्येच्या तुलनेत द्वितीय क्रमांकाचे शहर आहे. त्यामुळे निपाणी बरोबर बोरगाव शहराचाही सर्वांगीण विकास करणे हे जोल्ले दांपत्यांचे स्वप्न आहे. त्यामुळे या शहरासाठी आज तागायत कोट्यावधींचा निधी शहराच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी दिला असल्याचेही नगरसेवक शरदराव जंगटे यांनी सांगितले.
बैठकीस माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी. के. महाजन, अजित तेरदाळे, जितू पाटील, सचिन कोळी, शंकर गुरव, महावीर चोकावे, बंडू माळी, रावसाहेब चोकावे, बबन रेंदाळे, भरत पाटील, संजू महाजन, बाळू चौगुले, बाहुबली पाटील, महादेव ऐदमाळे, भरत कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० रुग्णांनी घेतला लाभ

Spread the love    निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना शाखा हदनाळ आणि डॉ.अनिल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *