कोल्हापूर : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर …
Read More »…तर आम्ही हातात दगड घेऊ! शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन
कोल्हापूर : सीमावादाला हिंसक वळण देणाऱ्या आणि बेताल वक्तव्ये करत सुटलेल्या कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीने कोल्हापुरात एल्गार पुकारला आहे. शनिवारी कोल्हापुरात कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. शनिवारी शाहू महाराजांच्या समाधीजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. …
Read More »बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर नेहमीच टीका केली, गौरवीकरण नाही; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डाॅ. जयसिंगराव पवारांचा खुलासा
कोल्हापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आता स्वतः जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरेंच्या भेटीविषयी निवेदन जारी करत मोठा खुलासा केला आहे. जयसिंगराव पवार म्हणाले, “राज …
Read More »प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदुषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (जिमाका): प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील …
Read More »राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूर (जिमाका) : शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या कष्टाची जाणीव असणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे हीत जोपासण्यासाठी या शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढेही राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जनहिताचे निर्णय घेतले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रींडांगणावर आयोजित केलेल्या शेतकरी जनसंवाद …
Read More »कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …
Read More »पत्नीचा गळा चिरुन केला खून; पती अटकेत
कोल्हापूर जिल्ह्यातील घटना शिरोली : मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोटावर धारदार विळ्याने सपासप वार करून तसेच गळा चिरुन खून केला. खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्यासुमार गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पांणद येथे घडली. पोलिसांतून …
Read More »25 नोव्हेंबरला राज्यभरात चक्काजाम आंदोलन; राजू शेट्टींचा एल्गार
कोल्हापूर : आम्हाला कोणाचे देणंघेणं नाही, महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद, साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांना आता मैदानातचं जाब विचारला जाईल, असा …
Read More »वेदगंगा, दूधगंगा नदीतील थेंबही पाणी देणार नाही
राजू पोवार : सीमाभागातील संघटनांचा कोल्हापूर आंदोलनात सहभाग निपाणी (वार्ता) : सुळकुड (ता. कागल) येथून दूध गंगा नदीद्वारे इचलकरंजी येथे पाणी पुरवण्याची मोठी योजना आहे. त्यामुळे कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन पुन्हा शेतकरी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे इचलकरंजी योजनेसाठी सीमाभागातील दूधगंगा नदीतून एक …
Read More »शिरोळ तालुक्यात ऊस आंदोलनाला हिंसक वळण; वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलकांमध्ये हाणामारी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात एकेक करून कारखान्याची धुरांडी सुरु होत असतानाच शिरोळ तालुक्यात मात्र अजूनही आंदोलनाचे लोण कायम आहे. तालुक्यात आज ऊस आंदोलनाला हिंसक वळण लागले. ऊस वाहतूक रोखल्याने कारखाना समर्थक आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हाणामारी झाली. शिरटी फाट्यावर हा सगळा घडला. आंदोलन अंकुशकडून शिरटी फाट्यावर वाहतूक …
Read More »