कोल्हापूर : डॉ. भारती पाटील यांच्या अध्ययनातून नव्या जाणिवेचा डोळस विद्यार्थी घडविलेला आहे असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. किशोर बेडकीहाळ यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, माजी विद्यार्थी संघटना आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या वतीने राज्यशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. भारती पाटील यांच्या …
Read More »4 वर्षांच्या मुलासह बापाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातील वादाचा वचपा काढण्यासाठी बाप लेकाचा खून केल्याच्या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरला आहे. अवघ्या चार वर्षांच्या मुलासह 37 वर्षीय बापाचा शेतात गाठून खून करण्यात आला आहे. काल (दि. 04) रोजी दुपारी ही घटना घडली. दरम्यान या घटनेची माहिती …
Read More »महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागात स्थानिक प्रशासनात उत्कृष्ट समन्वय
सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांचे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यपालांकडून कौतुक कोल्हापूर (जिमाका) : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिल्या. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेला …
Read More »अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सांत्वनपर भेट
कोल्हापूर (जिमाका): पंढरपूरला कार्तिकी एकादशीसाठी पायी निघालेल्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील वळीवडे व जठारवाडी येथील सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही वारकरी जखमी झाले होते. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांची आज जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांत्वनपर भेट घेऊन धीर दिला. यावेळी आमदार ऋतुराज …
Read More »सकल मराठा परिवारातर्फे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सीमाप्रश्न पंतप्रधानांनी सोडविण्याची मागणी! कोल्हापूर : भाषावार प्रांत रचनेनंतर गेली ६० वर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्राच्या – कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून सीमा भागातील गावांचा समावेश महाराष्ट्रमध्ये करावा, यासाठी सकल मराठा परिवार कोल्हापूर मार्फत निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात. गेली …
Read More »यंदा एफआरपीसह अधिकचे ३५० घेणारच; राजू शेट्टी
कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर दरवर्षी प्रमाणे यांदाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष …
Read More »’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत : कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के
तरुणांनी जिद्दीने वाटचाल करुन यशस्वी उद्योजक बनावे कोल्हापूर (जिमाका) : तरुणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करुन उद्योगनिर्मिती करताना अपयश आल्यास खचून न जाता जिद्दीने वाटचाल करुन यशाच्या दिशेने पुढे जावे, असे सांगून प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार्या अशा ’स्टार्ट अप’ शिबिरातून जिल्ह्यात अधिकाधिक नवउद्योजक घडावेत, अशी अपेक्षा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. …
Read More »अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून पाडू
माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा इशारा जयसिंगपूर : सध्या अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याची चर्चा सुरु आहे. मात्र, शासकीय पातळीवर त्याच्या हालचाली सुरु नाहीत. कर्नाटक सरकारने याबाबत महाराष्ट्र शासनाला अवगत केले नाही, अथवा त्यांनी राज्य सरकारशी कोणतीही चर्चा केली नाही, अलमट्टीची उंची एकतर्फी वाढवण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्न हाणून …
Read More »राधानगरी तालुक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार जाहीर
बेळगाव येथे उद्या शनिवारी माजी मुख्यमंत्री विरप्पा मोईली यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण कोल्हापूर (आनिल पाटील) : राधानगरी तालूक्याच्या तहसिलदार मीना निंबाळकर यांना प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य आदर्श सरकारी नोकर” गौरव पूरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व …
Read More »चंद्रे येथील बी. एस. पाटील यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर
बांधकाम व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल कोल्हापूर (आनिल पाटील) : चंद्रे (ता. राधानगरी जि. कोल्हापूर) येथील राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. पाटील (बळवंत सदाशिव पाटील) यांना बांधकाम व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल “आंतरराज्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाला असल्याबद्दलचे पत्र त्यांना नॅशनल …
Read More »