कोल्हापूर : शिवसेनेत बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालेले कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांच्या घरावर आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. खासदार मंडलिक यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आक्रमक शिवसैनिकांनी केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवत संजय मंडलिक यांनी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा …
Read More »अलमट्टी धरण 95 टक्के भरले, 72 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापूर : अलमट्टी धरणात 95 टक्के पाणीसाठा झाल्याने 72 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार दमदार पावसाने आज धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आला आहे. यापूर्वी 6 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरु होता. अलमट्टी धरणाची पाणी क्षमता 123.01 …
Read More »तरूण भारतच्या “त्या” चूकीच्या बातमीमुळे चंदगड राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त; सोशल मिडीयावर पत्रकाराचा खरपूस समाचार
चंदगड (एस. के. पाटील) : तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या चंदगडला घड्याळाच्या काट्याची बदलणार दिशा? या बातमीचे तीव्र पडसाद चंदगड विधानसभा मतदारसंघात उमटले. आज दिवसभर या चूकीच्या वृत्ताबद्दल संबंधीत पत्रकाराचा फोन व सोशल मिडीयावरून सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते व आमदार राजेश पाटील समर्थकांनी उद्धार केल्याचे समजते. चंदगडचे कार्यसम्राट आमदार राजेश पाटील …
Read More »हुपरीतील सख्खे भाऊ एनआयएच्या ताब्यात
कोल्हापूर : हुपरी येथे आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने टाकलेल्या छाप्यात दोघा तरूणांना ताब्यात घेतले आहे. दोघे तरूण सख्खे भाऊ असून पथकाने त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू केली आहे. ताब्यात घेतलेल्या पैकी एक जण एका फौंडेशनच्या माध्यमातून हुपरी रेंदाळ परिसरात कार्यरत आहे. तो एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून ताब्यात …
Read More »आदित्य ठाकरे एक ऑगस्टला कोल्हापूर दौऱ्यावर, बंडखोरांच्या मतदारसंघात तोफ धडाडणार
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी शिवसेना फोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आता शिवसेनेला पुन्हा एकदा सावरण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढताना थेट बंडखोरांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत असल्याने त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आदित्य …
Read More »सर्किट बेंच स्थापनेसाठी पाठपुरावा करू : एकनाथ शिंदे
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना स्पष्ट केले. कोल्हापूर सर्किट बेंचबाबत आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे …
Read More »खासदार धैर्यशील मानेंच्या घराकडे जाणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांशी झटापट
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्च धडकला. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला …
Read More »एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीचे हसन मुश्रीमांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
कागल (कोल्हापूर) : एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळं शिवसेना आणि शिंदे गटात वाद पेटला असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांचं कौतुक केलं जात आहे. त्यामुळं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलंय. महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास आणि कामगार अशी महत्वाची खाती सांभाळणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी आज …
Read More »कोल्हापूर : मानोली येथे बोगस डॉक्टरवर पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : मानोली पैकी मुसलमानवाडी (ता. शाहूवाडी) येथे अवैद्यरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रसाद रवींद्र कांबळे (वय २८, रा. डोणोली, ता. शाहूवाडी) असे संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित कांबळे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ …
Read More »खा. धैर्यशील माने यांच्या घरावर 25 जुलै रोजी शिवसैनिकांचा मोर्चा
कोल्हापूर : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘शिव संवाद’ यात्रेच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी जाऊन शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेऊन जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. यानंतर आता कोल्हापुरात देखील शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र दिसत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर …
Read More »