कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी पाऊस कमी झाल्याने कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 36 फुट 5 इंचावर आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. मात्र, सध्या कोणताही मोठा रस्ता …
Read More »खासदार संजय मंडलिकांच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी लावला जोर!
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे कळपात सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत दोघांकडूनही जाहीर वाच्यता करण्यात आलेली नाही. कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौर्यावर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिवराव मंडलिक कारखाना …
Read More »गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा; संभाजीराजेंची मागणी
कोल्हापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गडकोटांच्या संवर्धनासाठी स्वंतत्र मंत्रालयाची किंवा महामंडळाची निर्मिती करा, अशी मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणारे श्री शिवछत्रपती महाराजांचे गडकोट आज अत्यंत दुरावस्थेत आहेत. दिवसेंदिवस त्यांची अधिकच दुरावस्था होत आहे. …
Read More »कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड
संवर्धनासाठी देण्याचा उपक्रम कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांचा सहभाग कोल्हापूर : मे. अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप वाटप कार्यक्रम आज कोरगावकर पेट्रोल पंप येथे …
Read More »कोल्हापूरच्या दोन शिवसेना खासदारांवरून राजेश क्षीरसागरांचा मोठा दावा, विनायक राऊतांवरही केला गंभीर आरोप
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काल झालेल्या शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला
कोल्हापूर : गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने धूमशान घातल्यानंतर गेल्या 24 तासांपासून जोर ओसरू लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी काल स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. अलमट्टीतून दीड …
Read More »पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या समन्वयाने पूर व्यवस्थापनाच्या सुक्ष्म नियोजनाबद्दल यंत्रणांचे कौतुक कोल्हापूर (जिमाका) : भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा, अशा सूचना देऊन यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा …
Read More »पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर; ६४ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावरील बुरुज कोसळला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था सुरुच आहे. पन्हाळगडावरील बुरुजांची घसरण सुरूच असताना आता विशालगड किल्ल्यावर देखील असाच प्रकार आढळून आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याचा आज बुरुज ढासळला आहे. सुदैवाने पर्यटक गडावर नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गडावर जाण्यासाठी असलेल्या …
Read More »पंचगंगा नदीची पातळी 37.2 फुटांवर; 58 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी 37.2 फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 58 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. राधानगरी …
Read More »