Sunday , December 14 2025
Breaking News

महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चंदगड तालुक्यात काँग्रेसच्यावतीने जन आंदोलन

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यात आज दुपारी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीसंदर्भात जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी केले. कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्वे येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्ग …

Read More »

पुणे : सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा होरपळून मृत्यू

पिरंगुट – उरवडे (ता. मुळशी) येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 20 मजूर अडकून पडले होते. यापैकी 18 जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान …

Read More »

देवरवाडी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी!

चंदगड : देवरवाडी ग्रामपंचायत आणि प्रिन्स पाईप कंपनी, देवरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या काळात देवरवाडी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य कीट वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू पीठ,५ किलो तांदूळ, १ किलो तेल, १ किलो साखर, साबण, टूथपेस्ट आणि मास्क याचे वाटप करण्यात आले. उर्वरित जीवनावश्यक …

Read More »

चंदगड तालुक्यात चार हत्तींचा कळप दाखल; शेतकऱ्यांनी दक्ष रहावे

चंदगड तालुक्यात कर्नाटकातुन दाखल झालेला हत्तींचा कळप तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : महाराष्ट्रामध्ये सतत येणारा वनहत्तीचा कळप चंदगड वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची तयारी शेतकर्‍यांच्याकडून करण्यात येत असतानाच हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्याबरोबरच …

Read More »

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार : जयंत पाटील

सांगली : मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर अलमट्टी पाणी नियोजनबाबत कर्नाटक राज्याच्या मंत्र्यासोबत बंगळूरु या ठिकाणी बैठक होणार असल्याची माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी …

Read More »

टॉवर नेटवर्कअभावी पारगडवाशीयांची गैरसोय…

ईसापूर, पारगड, वाघोत्रे भागांतील ग्रामस्थ हैराण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होऊन त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क …

Read More »

नगरसेवक बाळासाहेब हळदणकर रुग्णांसाठी ठरले देवदूत…

चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन अनेकदा येथील कोविड रुग्णांसाठी रोजच्या रोज एकवेळचे जेवण देऊन येथील रुग्णांची सेवा करण्याचे कार्य नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केले आहे. जनसेवा हीं ईश्वरसेवा मानून आपल्या लोकांसाठी नेहमी ते सहकार्य करतं आहेत. लोकांना मास्क वाटप, गरजूना साहित्य वाटप, तसेच रुग्णांचे मनोबल …

Read More »

रेडेकर रुग्णालय येथे माजी सैनिकांना सीजीएचएस दराने उपचार होणार…

गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : सैनिक हा आपल्या देशाचा कणा आहे. तो आपले कर्तव्य बजावत सीमेवर अखंडपणे उभा असतो. अश्या या जवानाला आरोग्यविषयक अडचणी येऊ नये यांसाठी आता आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल भागातील माजी सैनिकांसाठी कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज येथे सीजीएचएस दराने उपचार केले जाणार आहेत. या भागातील जवानाला …

Read More »

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प …

Read More »

राज्यात सोमवारपासून ‘अनलॉक’ प्रक्रिया; मध्यरात्री नवे आदेश जारी

मुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यावरून बराच गोंधळ झाला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनलॉक प्रक्रियेची घोषणा केली. पण नंतर युटर्न घेत प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितल्यानं सरकारच्या कारभारावर टीका सुरु झाली होती. अखेर पाच टप्प्यात अनलॉक प्रक्रिया सोमवारपासून सुरु होणार …

Read More »