Monday , December 15 2025
Breaking News

महाराष्ट्र

बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा …

Read More »

कुदनूर येथे तीन कारखान्यांना भीषण आग; कोट्यवधी रुपयांचे नुकसान

  कुदनूर : नूतन वर्ष २०२३ च्या आरंभीच कुदनूर (ता. चंदगड) येथील शशिकांत शिवराम सुतार व बंधू यांच्या तीन कारखान्यांना भीषण आग लागली. सिद्धेश्वर सॉ मिल, सिद्धेश्वर ऑईल मिल आणि शिवराज फॅब्रिकेटर्स आग लागलेल्या कारखान्यांची नावे आहेत. या आगीत कारखान्यात बांधलेल्या दोन गोट व तीन दुचाकी जळून खाक झाल्या. आगीचे …

Read More »

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच…”, शंभूराज देसाईंचा उल्लेख ‘चंबू’ करत भास्कर जाधवांची टोलेबाजी

  मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीकास्त्र सोडताना भास्कर जाधव यांनी शंभूराज देसाईंचा उल्लेख ‘चंबू देसाई’ असा केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दम दिला आणि शंभूराज देसाईंच्या तोंडाचा ‘चंबू’ झाला, अशा शब्दांत भास्कर …

Read More »

अनिल देशमुख, संजय राऊत यांच्या सुटकेवरुन आता तरी धडा घ्या : शरद पवारांचे विधान

  बारामती : आज 2022 या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. नव्यावर्षाच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बारामती येथे आले असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. अनिल देशमुख यांच्या सुटकेवर बोलत असताना ते म्हणाले की, सत्तेचा गैरवापर होतोय, हे आम्ही सातत्याने सांगतोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्याबाबत हे …

Read More »

अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला : उद्धव ठाकरे

  मुंबई : दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर जोरदार आरोप झाले. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घाम फोडला आहे. राजीनाम्यांच्या मागण्या झाल्या. विरोधकांनी सभागृहाबाहेरही आंदोलनं केली. परंतु अद्याप एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने राजीनामे घेतले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच आरोप झाल्यानंतर क्लिनचिट देण्याचं …

Read More »

मुंबई ही महाराष्ट्राची, कोणाच्या बापाची नाही; कर्नाटकच्या शिक्षणमंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं

  नागपूर : मंत्र्यांनी केल्यानंतर आज याचे पडसाद विधानसभेत त्याचे पडसाद उमटले आहेत. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला असून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती …

Read More »

अनिल देशमुखांना हायकोर्टाचा दिलासा; उद्याच कारागृहातून सुटका

  मुंबई : अनिल देशमुखांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती आज संपणार आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात आज हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी …

Read More »

कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच; विधानसभेत सीमाप्रश्नी ठराव एकमताने मंजूर

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात सीमावादाच्या मुद्द्यावर कर्नाटकविरोधात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा शासकीय ठराव सभागृहाच्या पटलावर मांडला. हा ठराव मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही व्याकरणविषयक आणि वाक्यरचनांशी संबंधित आक्षेप घेतले. मात्र, त्यात आवश्यक बदल केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा; उद्धव ठाकरे

  नागपूर : कर्नाटकनं महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील कर्नाटकविरोधात ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधक सातत्यानं करत आहेत. आज उद्धव ठाकरेंनी देखील विधानपरिषदेत हल्लाबोल केला आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं …

Read More »

दिशा सालीयन प्रकरण कधीही हाताळले नाही : सीबीआय

  मुंबई : दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटले आहे. सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात …

Read More »