Sunday , September 20 2026
Breaking News

बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Spread the love

 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. या घटनेतील मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बार्शीतल्या पांगरी येथील फटाका कारखान्याला लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं आहे. जवळपास नऊ जण जखमी असून सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून, जखमींना मदत करण्यासाठी यंत्रणेचे प्रयत्न सुरू आहेत, असं शंभरकर यांनी सांगितलं आहे.
फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती आहे. माहितीनुसार 9 कामगार जखमी झाल्याची आणि तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ रविवारी दुपारी चारच्या सुमारास भीषण घटना घडली. ही फटाक्याची फॅक्टरी गेल्या दहा वर्षांपासून सुरु आहे. या फॅक्टरीत आजूबाजूच्या गावातील कामगार कामासाठी येत होते. आज चार वाजेच्या सुमारास फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट झाला. यात काही कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे तर गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत.
जखमींना तातडीने पांगरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच बार्शीतील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी भीषण घटना घडल्याने बार्शी तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *