खानापूर : धावत्या कारमध्ये स्फोट होऊन बघता बघता कारने पेट घेतल्याची घटना बेळगावजवळील चोर्ला घाटात घडली. गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कारला आज शनिवारी पहाटे चोर्ला घाटात आग लागली. नंतर कारने पूर्णपणे पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. कारला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी लागलीच गाडीबाहेर धाव …
Read More »मांडीगुंजीत बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर “प्रश्नमंजुषा” स्पर्धा
खानापूर : मौजे मांडीगुंजी येथे खास दीपावली निमित्त 27 ऑक्टोबर रोजी बाल शिवाजी युवक मंडळातर्फे, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “प्रश्नमंजुषा” स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये एक गटात चार विध्यार्थी अशा प्रमाणे, एकूण 10 गटांनी भाग घेतला होता. प्रश्न मंजुषा या कार्यक्रमात AP या गटाने प्रथम क्रमांकाची बाजी …
Read More »खानापूर तालुक्यातील रस्ते पीडब्ल्यूडी खात्याने त्वरीत करावे
रयत संघटनेचे अधिकारी वर्गाला निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका अतिमागासलेला तालुका असुन तालुक्यातील रस्त्याकडे पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष होत आहे. सध्या तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऊसाची वाहतूक करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी खानापूर तालुका संघटनेच्यावतीने बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कचेरी …
Read More »चापगांवात गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : चापगांवात (ता. खानापूर) येथील गावकऱ्यांच्या संकल्पनेतून नव्याने बांधण्यात आलेल्या श्री गणेश समुदाय भवनाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी दि. २७ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकट क. पाटील (मा. पैलवान) चापगांव हे होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. यावेळी समुदाय भवनाचे उद्घाटन चापगांव ग्रा. पं. उपाध्यक्ष मारुती …
Read More »शिंदोळीत नुतन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : शिंदोळी (ता खानापूर) येथील ग्राम दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार करून नुतन मंदिराचा पाया खोदाई शुभारंभ दीपावलीच्या शुभमुहुर्तावर नुकताच करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई तसेच ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमोद कोचेरी, …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक बैठक रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात आली आहे. यावेळी १ नोव्हेंबर काळादिन कर्नाटक सरकारचा निषेध करण्याबाबत तसेच तालुका विभागीय बैठका घेऊन गावोगावी जनजागृतीची रुपरेषा ठरविण्यासाठी आणि संघटना बळकट करणेबाबत विचारविनिमय करावयाचा …
Read More »खानापूरात दीपावली पाडव्यानिमित म्हैस पळविण्याची प्रथा
खानापूर (प्रतिनिधी) : दिवाळी सणानिमित्त खानापूर शहरासह तालुक्यात अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. त्याचप्रमाणे खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिराच्या पटांगणात निंगापूर गल्लीतील निलेश सडेकर यांनी बुधवारी दि. २६ रोजी येथील लक्ष्मी मंदिराच्या आवारात सालाप्रमाणे यंदाही धनगरी वाद्यासह लक्ष्मी मंदिरपासून घोडे गल्ली, स्टेशन रोड, महामार्गावरून निंगापूर गल्लीसह म्हशी पळविण्यात आल्या. प्रारंभी …
Read More »कित्तूर उत्सवातून घरी परतताना खानापूर येथील दोघांचा अपघाती मृत्यू
बेळगाव : कित्तूर उत्सव आटोपून परतत असताना कारच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना कित्तूर हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री घडली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापुर तालुक्यातील करविनकोप्प गावातील बाळाप्पा तळवार (३३) आणि केराप्पा तळवार (३६) हे कित्तूरला उत्सवानिमित्त गेले होते. उत्सव आटोपून घरी परतत असताना …
Read More »बेळगांव व्हाया कित्तूर रेल्वे मार्गाला गर्लगुंजी शेतकऱ्यांचा विरोध
खानापूर (प्रतिनिधी) : धारवाड- बेळगाव व्हाया कित्तूर होणाऱ्या रेल्वे मार्गाला जमीन अधिग्रहण प्राथमिक नोटिसा दिलेल्या आहेत. आक्षेप नोंदवण्यासाठी ३० दिवसाचा कालावधी आहे, त्यासाठी गर्लगुंजी गावातील शेतकऱ्यांची विरोध दर्शविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी बैठकीत प्राथमिक बैठक घेऊन विरोध नोंदविला आणि आक्षेप नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल, अशी चर्चा …
Read More »दीपावली निमित्त ज्ञानेश्वर माऊली ग्रुपच्या वतीने आदीवासी लोकांना स्वीट, कपड्याचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बाचोळी नजीक असलेल्या जंगलातील आदिवासी लोकाना गेल्या ६० वर्षापासून भारताचे नागरिक म्हणून जीवन जगताना त्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, की जीवन उपयुक्त लागणाऱ्या पाणी, उदरनिर्वाहसाठी लागणारी सामग्री, वीजपुरवठा, रस्ता, शिक्षण अशाप्रकारची कोणतीच सोय नाही. अशा नागरिकांना खास दीपावलीच्या सनाचे औचित्य साधुन ज्ञानेश्वर माऊली ग्रुपचे अध्यक्ष दिनेश …
Read More »