Monday , September 21 2026
Breaking News

मणतुर्गा- खानापूर बससेवेला होणार प्रारंभ

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा – खानापूर अशी बससेवा सुरू करा, अशी मागणी भाजपचे ग्रामीण सेक्रेटरी व मणतुर्गा गावचे सुपुत्र गजानन पाटील यांनी तालुका भाजप अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेपो मॅनेजर महेश तीरकनावर यांची भेट घेऊन केली.
खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, मन्सापूर आदी भागातील नागरीकांना, विद्यार्थी वर्गाला खानापूरला काॅलेज शिक्षणासाठी ये-जा करावी लागते. मात्र बसची सोय नसल्याने विद्यार्थी वर्गाचे नुकसान होते. शिवाय मणतुर्गा-असोगा मार्गावर बसची सोय नाही.
तेव्हा खानापूर- मणतुर्गा अशी बससेवा सुरू करा अशी यावेळी करण्यात आली.

यावेळी डेपो मॅनेजर महेश तीरकनावर यांनी स्वतः रस्त्याची पाहणी करून बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन यावेळी दिले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *