खानापूर (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या अमर बलिदानाने पावन झालेल्या या भूमीला पुण्यभूमी म्हणून उल्लेख केला जातो. भारत देशामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून ग्राम पंचायतीचा उल्लेख आवर्जून केला जातो परंतु या ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा कारनामा काही महिन्यांतच जनतेसमोर आला आहे. शनिवार दि. …
Read More »कुप्पटगिरी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन उद्या
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी क्राॅसजवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन सोमवारी दि. १७ रोजी २ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेत पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन …
Read More »कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम
खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज खानापूर तालुका महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी सहभाग दर्शविला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, जैन धर्मातून अहिंसा परमोधर्माची शिकवण मिळते. अहिंसा परमोधर्माची समाजाला नितांत गरज …
Read More »जांबोटी क्राॅसवरील सीडीचे काम पूर्ण होऊनही पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष, नागरिकांचे हाल
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जत-जांबोटी रस्त्यावरील जांबोटी क्राॅसवरील बालकल्याण खात्याच्या कार्यालयासमोर बांधण्यात आलेल्या सीडीेचे काम महिना होऊन गेला तरी याकडे खानापूर पीडब्ल्यूडी खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या मयेकर नगर, विद्या नगरातील नागरिकांना रस्ता बंद झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून नाराजी पसरली …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जळगे येथे जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा जागर करण्यासाठी आणि संपूर्ण तालुक्यात पुन्हा एकदा मराठी अस्मिता ज्वलंत करण्यासाठी ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज सीमासत्याग्रहात अग्रणी असलेले जळगे गावी बैठक घेऊन पालखीचा उद्देश सांगण्यात आला. गावचे ज्येष्ठ नागरिक तसेच ज्येष्ठ सीमासात्याग्रही श्री. …
Read More »खानापूर तालुक्यातील मराठी जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना ओळखा : बाळासाहेब शेलार
खानापूर : मध्यवर्तीशी संलग्न असलेल्या खानापूर तालुका समितीच्या बैठकीत त्या गटातील समिती नेत्यांनी एका वृत्तवाहिनीला एकीसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियांसंदर्भात 15 ऑक्टोबर रोजी “बेळगाव वार्ता”ने माझी प्रतिक्रिया प्रसारीत केली. पण त्या माझ्या प्रतिक्रियेवर काही कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांद्वारे उलटसुलट चर्चा सुरू केली आणि एकी बारगळण्यासाठी दिगंबर पाटील गट जबाबदार आहे …
Read More »हत्तरगुंजीची चिमुकली भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी
खानापूर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत खानापूर तालुक्यातील चिमुकलीचाही सहभाग लक्षवेधी ठरला. काल भारत जोडो यात्रेत खानापूरमधून हजारो कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये हत्तरगुंजी येथील सविता व गुंडू मयेकर यांची कन्या कु. तेजस्विनी गुंडू मयेकर ही देखील खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासोबत सहभागी झाली होती. कालच्या भारत …
Read More »तालुक्यातील अतिक्रमित जमिनधारक शेतकर्यांना सोमवारी मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जवळपास 5000 एकर जमिनीपैकी रेव्हनूपड जमिनी फॉरेस्ट खात्याच्या जमिनी, गायरान जमिनी, हंगामी लागवड, एचएल जमिनी, अशा जमिनी शेतकरी कसत आहेत. त्या जमिनीचा शेतकर्यांना लाभ व्हावा. यासाठी तालुक्यात सरकारी भू अतिक्रमित शेतकरी संघटनेची 2004 साली स्थापना होऊन शेतकरी वर्गाच्या बाजुने सरकारी दरबारी लढा चालू आहे. …
Read More »“भारत जोडो” पदयात्रेत खानापूर तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सामील : डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर
खानापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी होण्यासाठी आज पहाटे 4 च्या सुमारास दोन हजार कार्यकर्ते बेल्लारीकडे बसने रवाना झाले. त्याचबरोबर खाजगी वाहनाने देखील काँग्रेस कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. मा. आमदार अंजलीताई संपूर्ण कर्नाटकात राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभागी आहेत. त्यात आज खानापुरातून हजारोंच्या …
Read More »तब्बल आठ महिन्यानंतर मिळालेले खानापूर तालुका पंचायतीचे ईओ अधिकारी अद्यापही गैरहजर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा अतिमागासलेला व दुर्गम तालुका म्हणून सर्वाना परिचित आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात नेहमीच अनेक समस्या भेडसावत असतात. अशा समस्यानी ग्रस्त असलेल्या खानापूर तालुक्याला गेल्या आठ महिन्यापासून तालुका पंचायत कार्यनिर्वाह अधिकारी (एईओ) पद रिक्त होते. त्यामुळे तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. …
Read More »