खानापूर (विनायक कुंभार) : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या मिरज ते लोंढा, हुबळी मार्गावरील रेल्वे पुन्हा 25 ऑगस्ट व 26 ऑगस्टपासून धावणार आहेत. या एक्सप्रेस असल्यातरी आरक्षित नाहीत त्यामुळे प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मिरज-लोंढा-मिरज 07251 व 07352 या क्रमांकाची रेल्वे मिरजहून 25 ऑगस्टला तर लोंढ्यातून 26 ऑगस्टपासून धावणार …
Read More »सेवानिवृत्त शिक्षक संघटनेतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार
खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने संघटनेचे ८५ वर्ष पूर्ण केलेल्या १६ सभासदांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरुजी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. व्ही. एम. बनोशी, सेवानिवृत्त प्रिन्सिपॉल …
Read More »खानापूरात टिप्परसह अवैध वाळू जप्त
खानापूर : खानापूर पोलिसांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा टिप्पर जप्त केल्याची घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील देसूर गावातून चोर्ल्याकडे एका टिप्परमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात होती. खानापूर पोलिसांनी विशिष्ट माहितीवरून छापा टाकून मालासह लॉरी जप्त केली. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरू केली आहे. हा टिप्पर एसजे डेव्हलपरचा असून त्याचा …
Read More »खानापूर तालुक्यात कुंभार समाजाकडून नागपंचमीसाठी नागमुर्ती तयार
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे दरवर्षी होणार्या नागपंचमी सणासाठी खानापूर तालुक्यातील कुंभार समाजाकडून नागमुर्ती तयार केल्या जातात व घरोघरी या नागमुर्तीची मनोभावे पुजा केली जाते. खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी, सिंगीनकोप, तोपिनकट्टी, निट्टूर, गणेबैल, नंदगडसह अनेक गावातील कुंभार समाज नागपंचमीसाठी शेडू व काळी मातीचे मिश्रण करून त्या चिखलातून सुरेख अशा शेडूमिश्रीत मातीचे …
Read More »खानापूरात सहाय्यक कृषी अधिकारी मुल्ला यांचा निवृत्त निमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका कृषी कार्यालयाचे सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला हे ३६ वर्षाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार सोहळा कृषी कार्यालयाच्या सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषीअधिकारी डी. बी. चव्हाण होते. तर व्यासपीठावर सत्कारमुर्ती सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. मुल्ला सपत्नीक, अधिकारी व्ही. जी. मुंचडी …
Read More »भाजप युवा कार्यकर्ता नेट्टारू हत्येच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनेची निषेध फेरी व श्रध्दांजली
खानापूर (प्रतिनिधी) : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथील भाजपचे कार्यकर्ते प्रवीण नेट्टारू यांची हत्या केल्याच्या निषेधार्थ खानापूरात हिंदू संघटनांनी खानापूरचे भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली शहरातील लक्ष्मी मंदिरापासुन शिवस्मारक चौकापर्यत निषेध फेरी काढली. यावेळी प्रवीण नेट्टारू यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. भाजप युवा नेते पंडित ओगले म्हणाले की, राज्याचे …
Read More »डॉ. अंजलीताई फाऊंडेशनतर्फे गर्लगुंजीत स्कुल बॅग वाटप
खानापूर (विनायक कुंभार) : गर्लगुंजी येथील सर्व शाळांमध्ये मा. आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे आज वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा दिल्या. माध्यमिक शाळेतील मुलींसोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सर्व शाळांचे शिक्षक वृंद, …
Read More »ड्रोनव्दारे नॅनो युरीया खताच्या फवारणीची जांबोटीत प्रात्यक्षिके
खानापूर (प्रतिनिधी) : आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करून आपली प्रगती साधावी. या उद्देशाने शेतात भात पिकाला ड्रोनव्दारे नॅनो युरीयाखताच्या फवारणी ची प्रात्यक्षिके जांबोटीत (खानापूर) येथे कृषी खात्याच्यावतीने दाखविण्यात आली. यावेळी आमदार निंबाळकर, कृषीखात्याचे उपसंचालक एच. डी. कोळेकर, खानापूर कृषी अधिकारी डी. बी. …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कन्नड सक्ती विरोधात आणि मराठी परिपत्रके मिळविण्यासाठी ८ ऑगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक सोमवार दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिछत्रपती स्मारक भवन येथे बोलाविण्यात …
Read More »जन्म- मृत्यू प्रकरणांच्या हस्तांतरणाला खानापूर वकिलांचा विरोध
खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर न्यायालयात चालत आलेल्या जन्म मृत्यू नोंदणी प्रकरणांचे अधिकार बेळगाव प्रताधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याचा आदेश कर्नाटक शासनाने काढला आहे. या कायद्यात सुधारणा करावी हा आदेश अन्यायकारक असल्याचा आरोप करत खानापूर वकील संघटनेने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. महसूल भागावर कामाचा ताण असतानाच निवडणूक आणि इतर सरकारी योजनांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta