Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

कोडचवाडात दुर्गामाता दौडची सांगता

  खानापूर (प्रतिनिधी) : कोडचवाडात (ता. खानापूर) येथे दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून नवरात्र महोत्सव निमित्ताने सुरू असलेल्या दुर्गामाता दौडला आमाप प्रतिसाद मिळाला होता. यावेळी कोडचवाडातील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता गावात भगवेमय …

Read More »

चिगुळे – कोदाळी रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन

  खानापूर (तानाजी गोरल) : महाराष्ट्र , कर्नाटक सीमेलगतच्या गावासाठी महाराष्ट्र सरकारने आपल्या हद्दीत रस्ता करावा, यासाठी खानापूर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांना कोल्हापूर येथे भेटून रस्त्यासंदर्भात निवेदन दिले. कणकुंबी, चिगुळे, कोदाळी येथे फेब्रुवारी २०२३ मध्ये गंगा भागिरथी यात्रा होणार आहे. या यात्रेत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक तिन्ही …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी एक वाजता राजा शिवछत्रपती स्मारक भवन मधील माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी तालुक्यातील सर्व समितीप्रेमी नागरिकांनी व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे, असे महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी …

Read More »

बिष्टम्मा देवीच्या चरणी आमदार अंजलीताई निंबाळकर!

  खानापूर : आज दुपारी खानापूरच्या कार्यसम्राज्ञी आमदार डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी कक्केरी येथे जाऊन बिष्टाम्मा देवीचे दर्शन करून आशिर्वाद घेतले. खानापूर तालुक्यातील सामान्य जनता, कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी, या सर्वांचे जनजीवन सुखकर व्हावे असे देवीकडे साकडे घातले असल्याचे आमदार ताई म्हणाल्या. आमदार अंजलीताईंनी देवीची ओटी भरली. मंदिर कमिटीतर्फे आमदार …

Read More »

इदलहोंड ग्रा. पं. अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकरानी स्वखर्चातून केली इदलहोंड रस्त्याची दुरूस्ती

खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) गावच्या इदलहोंड ते बेळगांव पणजी महामार्गाच्या फाट्यापर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशातून तसेच वाहन धारकातून तसेच दुचाकी वाहन धारकातून कमालीची नाराजी पसरली होती. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनही देण्यात आले होते. मात्र संबंधित …

Read More »

गुंजी माउली देवी यात्रोत्सव उद्यापासून; बैल पळविण्याचा कार्यक्रम बंद होणार!

  खानापूर (तानाजी गोरल) : गुंजी माउली देवी यात्रोत्सवात परंपरागत पद्धतीने दरवर्षी पालखी प्रदक्षिणेनंतर गुजी पंचक्रोशीतील शेतकरी आपल्या बैलजोड्या शृंगारून मंदिराभोवती पळविण्याची प्रथा आहे. माउली देवी हे पंचक्रोशीतील आराध्य दैवत असून वर्षभर बैलजोडीचे संरक्षण व्हावे, कोणत्याही प्रकारची रोगराई किंवा बापा बैलजोडीला होऊ नये म्हणून येथील शेतकरी माउली देवीला नवस बोलतात …

Read More »

मान रस्त्यासाठी ६ ऑक्टोबरला रास्तारोको

  ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मान या गावात गेली ६० ते ७० वर्षे सातत्याने रस्त्यासाठी मागणी करूनही रस्ता करण्यात न आल्यामुळे शेवटी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी गुरुवार दि. ६ रोजी सकाळी ११ वाजता जांबोटी येथे रास्तारोको करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोवा चोर्ला घाट बेळगाव या मार्गावरील …

Read More »

ओलमणीत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणीत (ता. खानापूर) येथील विठ्ठल मंदिरात हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्या प्रविणा साबळे होत्या. कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, आकाश अथणीकर, नारायण पाटील, …

Read More »

काटगाळीत ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : काटगाळीत (ता. खानापूर) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही २७ व्या वर्षी होणाऱ्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ सोमवारी दि. ३ रोजी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप शंकर पाटील होते. प्रास्ताविक बाबू बस्तवाडकर यांनी केले. यावेळी मुहूर्तमेढ भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते रोवण्यात आली. यावेळी …

Read More »

खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत यांचा सहभाग

  खानापूर : खानापूर येथील दुर्गामाता दौडमध्ये डॉ. सोनाली सरनोबत सहभागी झाल्या होत्या. शिवस्मारक खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला दूध व कोमट पाण्याने अभिषेक करून सुरुवात झाली. पुतळ्याला पुष्पहार घालून कपाळावर अष्टगंध लावण्यात आला. सर्व धारकरी सुंदर भगवे फेटे परिधान करतात. डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वात भगव्या ध्वजाचे पूजन …

Read More »