प्रशासनाचा अनागोंदी प्रकार खानापूर : खानापूर तालुका सरकारी रुग्णालयातील महिला एमडी डॉक्टर दिडवर्षे झाली बेळगाव जिल्हा रुग्णालयात सेवा बजावत असल्याचे उघड झाले आहे, यामुळे तालुक्यातील रुग्णांची गैरसोय होत आहे. सर्वसामान्यांच्या सोयीसाठी तज्ञांची नियुक्ती केलेली असते पण केवळ स्वतःच्या सोयीसाठी डेप्युटेशन करून घेणे ही संतापजनक बाब आहे तालुक्यातील आरोग्याची समस्या …
Read More »जांबोटीत संगीताचार्य विष्णू सडेकरांचा गुरुवंदनानिमित्त सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील संगीताचार्य विष्णू सडेकर यांचा गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून मणतुर्गे गावच्या बाल शिवाजी भजनी मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ, पानविडा देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या चरणाशी संगीत भजनाची बाल शिवाजी भजनी मंडळाच्या वतीने गुरूवंदना अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर गुरुजींना नेहमीच तबल्याची साथसंगत करत आलेले त्यांचे …
Read More »यंदाही शांतिनिकेतन सीबीएसई दहावीचा निकाल 100 टक्के
खानापूर : तोपिनकट्टी (ता. खानापूर) श्रीमहालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही 100 टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षाही 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नुकताच जाहीर झालेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सलग आठ वर्षे शांतिनिकेतन पब्लिक …
Read More »९९ लाखाच्या रस्त्याची वर्षभरात दैना
बिदरभावी, लोकोळी, कमशिनकोप रस्ता; नागरिकांतून संताप खानापूर : वर्षभरापूर्वी ९९ लाख ४८ हजार रु. चा निधी खर्ची घातलेल्या बिदरभावी, लोकोळी आणि कमशिनकोप गावाला जोडणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याची दैना उडाली आहे. वर्षभरताच नागरिकांच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचा खड्डेमय रस्ता आल्याने संताप व्यक्त करण्यात येतो आहे. नाबार्डच्या फंडातून या रस्त्यांच्या विकासासाठी ९९ …
Read More »खानापूर तालुक्यातील १०६ गावाना देगांव बहुग्राम योजनेचा होणार लाभ
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र व राज्य सरकारच्यावतीने शाश्वत पाणी योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे खेडोपाडी जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी कित्तुर व खानापूर तालुक्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत देगांव बहुग्राम पाणी योजनेसाठी ५६५ कोटी रुपये अनुदान मंजुरीचा निर्णय कॅबिनेट बैठकीत झाल्याने खानापूर तालुक्यातील १०६ गावाचा या योजनेत समाविष्ट केल्याने घर …
Read More »मुघवडे मार्गावरील पूल धोकादायक
खानापूर : मुघवडे मार्गावर मळव नजीकचा मलप्रभा नदीवरील पूल अपघातांना निमंत्रण देत आहे. पुलावर खड्डे पडून पाणी साचल्याने पूल धोकादायक बनला असून कठडे वाहून गेल्याने वाहतुकीला देखील धोका निर्माण झाला आहे. सदर पूल हा आठ गावांसाठी आधार आहे. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा नागरिकांना लाकडी सकवावरून ये-जा करावी लागत …
Read More »खानापूर – रामनगर रस्त्याचे काम लवकरच करण्याचे आश्वासन
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास निवेदन खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील प्रकल्प संचालक यांना निवेदन देण्यात आले. खानापूर ते रामनगर पर्यंत हा महामार्ग निर्माण करण्याचे काम काही वर्षापासून या-ना त्या कारणाने रखडलेला आहे. या महामार्गावर अवलंबून …
Read More »कस्तुरीरंगन अहवालाविरोधात खानापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत लढा उभारावा; मणतुर्गा ग्रामस्थांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने कस्तुरीरंगन अहवालाच्या अंमलबजावणीसाठी सुचना जारी केली असून 60 दिवसाची मुदत दिली आहे. याला तालुक्यातील विविध गावातून तसेच संघटनांतून विरोध करण्यात येत असून यासाठी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रीत येऊन अभ्यासु जानकाराच्या सल्ल्यानुसार यावर चर्चा करून योग्य ती पावले उचलावी, अशी माहिती मणतुर्गा गावचे व …
Read More »निट्टूर मराठी शाळेची इमारत व व्यायाम शाळेची खोली जमीनदोस्त; तहसीलदारांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : निट्टूर (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेची इमारत तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेची खोली नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे जमिनदोस्त झाल्या. त्यामुळे मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना तसेच श्री स्वामी विवेकानंद व्यायाम शाळेच्या व्यायामपट्टूची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तहसीलदारांनी पाहणी करून समस्या दुर करावी, अशा मागणीचे …
Read More »बिडी येथील नेहरू मेमोरियल संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खानापूर : बिडी ता. खानापूर येथील नेहरू मेमोरियल संयुक्त महाविद्यालयत इयत्ता दहावीच्या आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच इयत्ता अकरावी, नववी व आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून, आई-वडीलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच मोबाईलचा कमीत वापर करावा, नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta